Advertisement

तासगावकर कॉलेजच्या विद्यार्थ्यांना मुंबई विद्यापीठाचा दिलासा


तासगावकर कॉलेजच्या विद्यार्थ्यांना मुंबई विद्यापीठाचा दिलासा
SHARES

गेल्या अनेक दिवसांपासून कर्जत येथील सरस्वती शिक्षण संस्थेचे यादवराव तासगावकर अभियांत्रिकी व फार्मसी महाविद्यालयाच्या शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. या आंदोलनामुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी पूनर्मूल्यांकन, उत्तरपत्रिकेची छायाप्रत व पुर्नपरीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचे परिक्षा अर्ज कर्जत येथील कोकण ज्ञानपीठ अभियांत्रिकी कॉलेजमध्ये स्वीकारण्यात येतील, असं परिपत्रक मुंबई विद्यापीठानं नुकतेच प्रसिद्ध केलं आहे.



१६ एप्रिल पर्यंत अर्ज स्वीकारणार

सदर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी विद्यार्थ्यांच्या सेमिस्टर १, २, ७, व ८ चे परीक्षा अर्ज कर्जत येथील कोकण ज्ञानपीठ अभियांत्रिकी महाविद्यालयात स्वीकारण्यात येतील. १६ एप्रिलपर्यंत विद्यार्थ्यांचे पूनर्मूल्यांकन, उत्तरपत्रिकेची छायाप्रत व पुर्नपरीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्ज स्वीकारण्यात येतील, असं मुंबई विद्यापीठानं म्हटलं अाहे.



विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी हेल्प डेस्क

तासगावकर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना विद्यापीठ वाऱ्यावर सोडणार नाही. त्याबाबतची कोणतीही जबाबदारी झटकणार नसल्याचं सांगत परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ अर्जुन घाटुळे यांंनी विद्यार्थ्यांना दिलासा दिला आहे. कोकण ज्ञानपीठ अभियांत्रिकी महाविद्यालयाकडून विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी हेल्प डेस्क निर्माण करण्यात येणार असून त्यांना सर्वतोपरी मदत करणार असल्याचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मधुकर लेंगरे यांनी सांगितले.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा