विद्यापीठात रंगणार राष्ट्रीय वसंत नाट्योत्सव

नाट्योत्सवात देशभरातील वेगवेगळ्या भाषांमधील १५ नाटकांचे प्रयोग करण्यात येणार असून उद्धाटन झाल्यानंतर अकॅडमी ऑफ थिएटर आर्ट्सचे विद्यार्थी डॉ. मंगेश बनसोड लिखित आणि दिग्दर्शित 'निशाणी डावा आंगठा' या नाटकाचा प्रयोग करण्यात येणार आहे.

SHARE

मुंबई विद्यापीठाच्या अॅकॅडमी ऑफ थिएटर आर्टस् आणि नवी दिल्लीच्या संगीत नाटक अकादमी यांच्या एकत्रित विद्यमाने मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसमध्ये ११ व्या राष्ट्रीय वसंत नाट्योत्सवाचे आयोजन करण्यात आलं आहे. शनिवारी २ मार्चला राज्यमंत्री रविंद्र वायकर यांच्या हस्ते या नाट्योत्सवाचे उद्धाटन करण्यात येणार असून १० मार्चपर्यंत हा नाट्योत्सव रंगणार आहे. विशेष म्हणजे या नाट्योत्सवासाठी ज्येष्ठ दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल आणि ज्येष्ठ अभिनेत्री हिमानी शिवपुरी या प्रमुख अतिथी असणार आहेत. 


नाट्यप्रेमींसाठी पर्वणी

या नाट्योत्सवात देशभरातील वेगवेगळ्या भाषांमधील १५ नाटकांचे प्रयोग करण्यात येणार आहेत. उद्धाटन झाल्यानंतर अकॅडमी ऑफ थिएटर आर्ट्सचे विद्यार्थी डॉ. मंगेश बनसोड लिखित आणि दिग्दर्शित 'निशाणी डावा आंगठा' या नाटकाचा प्रयोग करण्यात येणार आहे. त्याशिवाय ४ मार्चला हरिष इथापे दिग्दर्शित 'तेरवं' या नाटकाचा प्रयोगही या नाट्योत्सवात नाट्यप्रेमींना पहायला मिळणार आहे. विशेष म्हणजे या नाटकात आत्महत्येचा मार्ग पत्करलेल्या शेतकऱ्यांच्या परिवारातील विधवा, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुली अभिनय करणार आहेत. त्यामुळे सर्व नाट्यप्रेमींसाठी विविध नाट्य, नृत्य, आणि विविध मनोरंजनाची पर्वणी ठरणार हा नाट्योत्सव असणार आहे. हेही वाचा -

अमोल कोल्हेंच्या हातावर आता घड्याळ्याची टिकटिक

यासाठी स्मितानं केसांना दिली तिलांजली!संबंधित विषय
ताज्या बातम्या