Advertisement

आयडॉल संस्थेचा टीवायबीकॉमचा निकाल जाहीर


आयडॉल संस्थेचा टीवायबीकॉमचा निकाल जाहीर
SHARES

मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्था (आयडॉल) मधील तृतीय वर्ष बी.कॉम (सेमिस्टर ६) या परीक्षेचा निकाल मंगळवारी १८ सप्टेंबरला जाहीर झाला. २०१७-१८ या शैक्षणिक वर्षात आयडॉलच्या बी. कॉम परीक्षेत बसलेल्या विद्यार्थ्यांचा निकाल ५८.३१ टक्के इतका लागला आहे.


निकाल १०० दिवसानंतर जाहीर

मे २०१८ मध्ये बी-कॉमची परीक्षा घेण्यात आली होती. विद्यापीठ कायद्याप्रमाणे जास्तीत जास्त ४५ दिवसांच्या आत परीक्षांचं निकाल लावणं बंधनकारक असलं तरीदेखील बीकॉमचा हा निकाल जवळपास १०० दिवसानंतर जाहीर करण्यात आला आहे.


इतके विद्यार्थी उत्तीर्ण

बी.कॉमच्या परीक्षेला ६ हजार ६०४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून त्यातील ५ हजार ९१५ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यातील २ हजार ३०४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून १ हजार ६४७ विद्यार्थी अनुउत्तीर्ण झाले. या निकालात ३०३ विद्यार्थ्यांना फर्स्ट क्लास, १ हजार ०६५ विद्यार्थ्यांना सेकंड क्लास आणि ९३६ विद्यार्थ्यांना पास क्लास मिळाला आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा