Advertisement

परीक्षेला उशिरा पोहचणाऱ्या विद्यार्थ्यांना मुंबई विद्यापीठाचा दिलासा


परीक्षेला उशिरा पोहचणाऱ्या विद्यार्थ्यांना मुंबई विद्यापीठाचा दिलासा
SHARES

रेल्वेभरतीतील अॅप्रेंटिसच्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे मध्य रेल्वे मंगळवारी सकाळी ऐन गर्दीच्या वेळीच ठप्प झाली. अचानक रेल्वे बंद केल्याने, मुंबईकरांचे तुफान हाल झाले. विशेषतः सध्या सर्व महाविद्यालयीन आणि शालेय विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू असून त्यांना याचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. मात्र विद्यापीठाकडून या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.


विद्यार्थ्यांना दिलासा

रेलरोकोमुळे विद्यार्थी सकाळी १० आणि दुपारी २ च्या सत्राच्या परीक्षांना वेळेवर पोहचू शकत नाहीत. वाहतुकीची समस्या आणि त्यामुळे विद्यार्थ्यांचा झालेला खोळंबा लक्षात घेत विद्यार्थ्यांना १ तास उशिरापर्यंत परीक्षा केंद्रात येण्याची परवानगी देण्याचे निर्देश विद्यापीठाकडून परिपत्रक काढून देण्यात आले आहेत. विद्यार्थी जितका उशिरा येईल तितकाच वेळ त्याला वाढवून द्यावा असंही नमूद करण्यात आलं आहे.

विद्यार्थ्यांनी माटुंगा ते दादर दरम्यान रेल्वे रुळावर ठिय्या मांडल्याने लोकलसह बाहेरगावी जाणाऱ्या एक्स्प्रेसही रखडल्या होत्या, त्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रांवर वेळेवर पोहचता येणे शक्य नव्हते.

महाविद्यालयाच्या प्रथम आणि द्वितीय वर्षांच्या पुनर्परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा मंगळवारपासून सुरू झाल्या आहेत. बीए, बीकॉम, बीएस्सी आणि इतर प्रथम आणि द्वितीय वर्षांच्या परीक्षा विद्यार्थी देणार आहेत. विद्यापीठाच्या सर्व विभागाचे संचालक, केंद्र प्रमुख, महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक या सर्वांना या सूचना पाठवण्यात आल्या आहेत.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा