Advertisement

मुंबई विद्यापीठाच्या हिवाळी सत्र परीक्षेच्या नव्या तारखा जाहीर

परीक्षेच्या (Exams) तयारीसाठी कमी वेळ मिळाल्या कारणाने विद्यार्थ्यांनी दिवाळीच्या आधी परीक्षा घेण्यास विरोध दर्शवला होता. त्यानंतर नव्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत.

मुंबई विद्यापीठाच्या हिवाळी सत्र परीक्षेच्या नव्या तारखा जाहीर
SHARES

मुंबई विद्यापीठ (Mumbai University) अंतर्गत येणाऱ्या सर्व महाविद्यालयांच्या दिवाळीनंतर होणाऱ्या परीक्षाच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत.

हिवाळी सत्र परीक्षा (Winter Session Exams) या दिवाळीनंतर (Diwali 2022) घेण्याचा निर्णय काही दिवसांपूर्वीच घेण्यात आला. सुरुवातीला या परीक्षा दिवाळीआधी घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पण परीक्षेच्या (Exams) तयारीसाठी कमी वेळ मिळाल्या कारणाने विद्यार्थ्यांनी दिवाळीच्या आधी परीक्षा घेण्यास विरोध दर्शवला होता.

गेल्या आठवड्यात शहरातील विविध महाविद्यालयांतील अंतिम वर्षाच्या विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांनी विद्यापीठ प्रशासनाला पत्र लिहून परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली होती. त्यानंतर विद्यापीठाने एक नोटीस जारी करून परीक्षा पुढे ढकलल्याची माहिती दिली.

“विद्यार्थ्यांच्या वारंवार मागणीनंतर परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. सर्व परीक्षा दिवाळीनंतर घेतल्या जातील,” असे डॉ. प्रसाद कारंडे, बोर्ड ऑफ एक्झामिनेशन अँड इव्हॅल्युएशनचे प्रभारी संचालक म्हणाले.

मुंबई विद्यापीठानं 2022 चे द्वितीय सत्र म्हणजे, हिवाळी सत्र परीक्षेच्या सुधारित तारखा जाहीर केल्या असून या परीक्षा 4 नोव्हेंबर 2022 पासून सुरू होत आहेत. यातील 2022-23 या शैक्षणिक वर्षाच्या तृतीय वर्ष बीए (BA) आणि बीएस्सी (Bsc) सत्र 5 च्या परीक्षा 4 नोव्हेंबर तर तृतीय वर्ष बीकॉम सत्र 5 ची परीक्षा 18 नोव्हेंबर 2022 पासून सुरु होत आहेत.

हिवाळी सत्राच्या सर्व विद्याशाखेच्या नियमित आणि बॅकलॉगच्या सर्व परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहेत.

तंत्रज्ञान विद्याशाखेच्या आणि दूर-मुक्त अध्ययन संस्थेच्या परीक्षेच्या तारखा लवकरच जाहीर करण्यात येतील. सर्व विद्याशाखेच्या सर्व परीक्षेच्या तारखेचे परिपत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.



हेही वाचा

विद्यार्थ्यांची झोप महत्त्वाची! राज्य सरकार 'या' निर्णयाच्या विचारात

विद्यार्थ्यांनो तयारीला लागा! पुढील वर्षीच्या दहावी, बारावी परीक्षेच्या तारखा ठरल्या

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा