आता तंत्रज्ञांचं भरारी पथक रोखणार पेपरफुटी

ऑनलाईन पाठवल्या जाणाऱ्या प्रश्नपत्रिकांचा कुणी लिक करू नये. यासाठी मुंबई विद्यापीठ खास तंत्रज्ञांचं पथक नेमणार आहे.

SHARE

मुंबई विद्यापीठात परीक्षांदरम्यान प्रश्नपत्रिका व्हॅट्सअॅपवर व्हायरल होऊ नयेत. ऑनलाईन पाठवल्या जाणाऱ्या प्रश्नपत्रिकांचा कुणी लिक करू नये. यासाठी मुंबई विद्यापीठ खास तंत्रज्ञांचं पथक नेमणार आहे.


निर्णयमागं कारण काय?

दिवाळीनंतर द्वीतीय सत्राची परिक्षा सुरू झाल्यानंतर टीवायबीएमएसच्या प्रश्नपत्रिका व्हॅट्सअॅपवर फुटल्याची घटना नुकतीच समोर आली आहे. याच पार्श्वभूमीवर विद्यापीठाने एक समिती नेमली होती. त्या समितीने नुकताच आपला अहवाल विद्यापीठाकडे सादर केला होता. याच अहवालातील शिफारसीनुसार तज्ञांचं भरारी पथक नेमण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला आहे.


या अहवालात ऑनलाईन प्रक्रीयेतील त्रुटींना आळा घालण्यासंबंधी शिफारसी करण्यात आल्या होत्या. यानुसार माहीती तंत्रज्ञान सुविधा तपासणी स्वरूपाची दोन भरारी पथके विद्यापीठाने नेमली आहेत. ही पथके परिक्षा केंद्रावर अचानक भेट देतील. आणि ऑनलाईन यंत्राची तपासणी करतील.

- डॉ. विष्णू मगरे, प्रभारी प्रकुलगुरू


हेही वाचा-

चोख सुरक्षेत झाला टीवायबीकाॅमचा पहिला पेपरसंबंधित विषय
ताज्या बातम्या