Advertisement

चोख सुरक्षेत झाला टीवायबीकाॅमचा पहिला पेपर

पुन्हा पेपरफुटीसारखे प्रकार घडू नयेत म्हणून प्रत्येक परीक्षा केंद्रावर पोलीस बंदोबस्तासह विशेष काळजी घेण्यात आली होती. त्यामुळे टीवायबीकॉमचा पहिला पेपर सुरळीत पार पडला.

चोख सुरक्षेत झाला टीवायबीकाॅमचा पहिला पेपर
SHARES

टीवायबीएमएमचे सलग ४ पेपर फुटल्यामुळे हादरलेल्या मुंबई विद्यापीठाने सोमवारपासून सुरू झालेल्या टीवायबीकाॅम परीक्षेसाठी चोख बंदोबस्त ठेवला होता. पुन्हा पेपरफुटीसारखे प्रकार घडू नयेत म्हणून प्रत्येक परीक्षा केंद्रावर पोलीस बंदोबस्तासह विशेष काळजी घेण्यात आली होती. त्यामुळे टीवायबीकॉमचा पहिला पेपर सुरळीत पार पडला. 


भरारी पथकात वाढ

सोमवारपासून सुरू झालेल्या परीक्षेदरम्यान पुन्हा पेपरफुटीचा प्रकार घडू नये म्हणून विद्यापीठाने भरारी पथकाच्या संख्येत वाढ केली आहे. ही भरारी पथके परीक्षा केंद्रांना अचानक भेट देणार आहेत. टीवायबीकाॅमसाठी एकूण २५३ परीक्षा केंद्र आहेत.


एक तासाशिवाय सुटका नाही

पेपर सुरू झाल्यानंतर पुढच्या तासाभरात कोणत्याही विद्यार्थ्याला परीक्षा केंद्राबाहेर पडण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. एखाद्या विद्यार्थ्याला आर्ध्या तासानंतर परीक्षा केंद्राबाहेर जायचं असल्यास त्याला उत्तरपत्रिकेसह प्रश्नपत्रिकाही जमा करावी लागणार आहे.


काॅलेजांना दक्ष राहण्याचा इशारा

मागच्या २ वर्षांपासून ऑनलाईन पेपर डिलिव्हरी सिस्टीम वापरण्यात येत असूनदेखील टीवायबीएमएमचे ४ पेपर फुटल्यामुळे विद्यापीठ हादरलं आहे. त्यामुळे विद्यापीठाने परीक्षा केंद्र असलेल्या सर्व काॅलेजांना दक्ष राहण्याचा इशारा दिला आहे. पुन्हा असा अनुचित प्रकार घडू नये, यासाठी काॅलेजही दक्ष झाली आहेत.


सोमवारचा पेपर सुरळीत

सोमवारी टीवायबीकॉमच्या पाचव्या सत्राची परीक्षा सुरू झाली. २५३ परीक्षा केंद्रावर एकूण ७८ हजार विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. चोख बंदोबस्त असल्यामुळे पहिला पेपर सुरळीत झाल्याचं म्हटलं जात आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा