विद्यापीठात मिळणार पुरातत्व शास्त्राचे धडे

  Fort
  विद्यापीठात मिळणार पुरातत्व शास्त्राचे धडे
  मुंबई  -  

  येत्या शैक्षणिक वर्षापासून मुंबई विद्यापीठात पुरातत्वशास्त्राचे धडे गिरवता येणार आहेत. यंदाच्या शैक्षणिक सत्रापासून 2 वर्षे कालावधीचा पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू होत आहे. त्यासाठी लवकरच वेगळा पुरातत्व विभाग सुरू करण्यात येईल, असे विद्यापीठाचे कुलगुरू संजय देशमुख यांनी सांगितले. 15 जूनपासून यासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे. 

  याआधी पुरातत्वशास्त्र हा विषय प्रमाणपत्र अभ्याक्रम म्हणून सुरू होता. 'विकेंड कोर्स' म्हणून सुरू झालेल्या या अभ्यासक्रमाला विद्यार्थ्यांचा वाढता प्रतिसाद बघता दोन वर्षांचा अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतल्याचे विभागाच्या संचालिका डॉ. मुग्धा कर्णिक म्हणाल्या. विद्यार्थ्यांना या विषयात शिक्षण घ्यायचे झाल्यास त्यांना डेक्कन कॉलेज किंवा परदेशात जावे लागते.

  या वर्षी पूर्णवेळ अभ्यासक्रमासाठी 60 विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येईल. दोन वर्षांत 4 सत्रांमध्ये (semester) मध्ये हा अभ्यासक्रम विभागण्यात आला आहे.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.