Advertisement

मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांची 'रायगड परिक्रमा'


मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांची 'रायगड परिक्रमा'
SHARES

ज्यांनी रायगड राजधानीतून लोकशाही, समानता आदर्श न्यायव्यवस्था निर्माण केली, अशा शिवरायांचा आदर्श विद्यार्थ्यांनीही घ्यायला हवा, असे विचार मुंबई विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी रायगड किल्ल्यावर राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांसमोर व्यक्त केले.

डॉ. देवानंद शिंदे हे रायगड किल्ल्यावर 'रायगड - परिक्रमा शिवराजधानीची' या उपक्रमात बोलत होते. 'रायगड - परिक्रमा शिवराजधानीची' ही मुंबई विद्यापीठ, शिवाजी विद्यापीठ आणि भारतीय पुरातत्व विभागाच्या वतीने राष्ट्रीय सेवा योजनेच्या १०० विद्यार्थ्यांना घेऊन आयोजित केली होती.

दोन्ही विद्यापीठातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांना शिवाजी महाराजांच्या कार्याची अनुभूती होण्यासाठी आणि इतिहासाची जाणीव व्हावी, याची महती देण्यासाठी ही 'रायगड - परिक्रमा शिवराजधानीची' हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. मुंबई विद्यापीठाचे विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक डॉ. सुनील पाटील, राष्ट्रीय सेवा योजनेचे डॉ. बिडवे, डॉ. देवकर आणि कोल्हापूर विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे डॉ. गायकवाड यांनी या परिक्रमेची मोहीम आखली होती.

सकाळी सर्व विद्यार्थ्यांनी रायगड परिक्रमेला प्रारंभ केला. विद्यार्थ्यांसोबत कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे हे देखील होते. रायगड किल्ल्यावरील १४०० पायऱ्या चढून सर्व विद्यार्थी पोहचले. ही परिक्रमा करीत असताना राष्ट्रीय सेवा योजनेचे हे विद्यार्थी स्वच्छता मोहीमही राबवत होते. यावेळी प्लास्टिक, कचरा, विविध बाटल्या अशा सर्व गोष्टी एकत्र करून स्वच्छता मोहीम राबवण्यात आली.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा