Advertisement

मुंबई विद्यापीठात अभियांत्रिकी अभ्यासक्रम आता मराठीतून

मुंबई विद्यापीठात मंगळवारी विद्या परिषदेची बैठक पार पडली. यामध्ये विद्यापीठाच्या आणि विद्यार्थ्यांच्या विकासाच्या दृष्टीने अनेक विषयांना मंजुरी देण्यात आली.

मुंबई विद्यापीठात अभियांत्रिकी अभ्यासक्रम आता मराठीतून
SHARES

मुंबई विद्यापीठाच्या संलग्नित महाविद्यालयांमध्ये आता लवकरच मराठी भाषेमध्ये अभियांत्रिकेचे धडे गिरवता येतील. मुंबई विद्यापीठात मंगळवारी विद्या परिषदेची बैठक पार पडली. यामध्ये विद्यापीठाच्या आणि विद्यार्थ्यांच्या विकासाच्या दृष्टीने अनेक विषयांना मंजुरी देण्यात आली. 

मुंबई विद्यापीठात या शैक्षणिक वर्षांपासून विविध नाविण्यपूर्ण उपक्रमांची सुरुवात होत आहे. विद्यापीठ पातळीवर विविध विषयांना एका छत्राखाली आणण्यासाठी स्कूल संकल्पना राबवली जाणार आहे. विविध विद्याशाखाअंतर्गत असणाऱ्या विषयांची ओळख आणि ते विषय शिकण्याची संधी यानिमित्ताने विद्यार्थ्यांना उपलब्ध होऊ शकेल. शिवाय, विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्याशाखाअंतर्गत अभियांत्रिकीच्या शिक्षणात आमुलाग्र बदल घडून येणार आहेत. क्षेत्रीय भाषांमध्ये अभियांत्रिकीचे शिक्षण देण्याच्या एआयसीटीच्या शिफारशीलाही विद्या परिषदेमध्ये मंजूरी देण्यात आली. त्यामुळे मुंबई विद्यापीठाच्या सलंग्नित महाविद्यालयांमध्ये लवकरच मराठीमधून अंभियांत्रिकेचे धडे गिरवले जातील.

स्कुल संकल्पनेमध्ये  स्कूल ऑफ इंडियन लँग्वेजेस, स्कूल ऑफ इंग्लिश अँड फॉरेन लँग्वेजेस, स्कूल ऑफ सोशल सायन्सेस आणि स्कूल ऑफ पर्फॉर्मिंग आर्ट्स अशा विविध स्कूल्सची स्थापना करण्यासाठी विद्या परिषदेमध्ये मंजूरी देण्यात आली. 

औद्योगिक गरजा लक्षात घेऊन अभियांत्रिकीच्या आठ शाखांमध्ये उद्योन्मुख नवीन विषयांच्या अभ्यासक्रमांना सुरुवात करण्यात आली आहे. ज्यामध्ये आर्टीफिशिअल इंटेलिजेंस अँड डेटा सायन्स, आर्टीफिशिअल इंटेलिजेंस अँड मशिन लर्निंग, सायबर सिक्युरिटी, इंटरनेट ऑफ थिंग्स, डेटा इंजिनिअरिंग, कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरींग (डेटा सायन्स), कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरींग (आर्टीफिशिअल इंटेलिजेंस अँड मशिन लर्निंग), कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरींग (इंटरनेट ऑफ थिंग्स अँड सायबर सिक्युरिटी इन्क्ल्युडिंग ब्लॉकचेन टेक्नोलॉजी) अशा अभ्यासक्रमांची सुरुवात करण्यात आली आहे.

याशिवाय विद्यार्थ्यांमध्ये एनसीसीबाबत जनजागृती व्हावी, विद्यार्थ्यांचा राष्ट्रसेवेमध्ये सहभाग वाढावा यासाठी ज्या महाविद्यालयात एनसीसी युनिट आहे. त्या महाविद्यालयात एनसीसी हा वैकल्पिक विषय म्हणून सुरू करण्यासाठीही मंजुरी देण्यात आली आहे. तसंच मुंबई विद्यापीठात नव्याने सुरू करण्यात आलेल्या सागरी अध्ययन केंद्र आणि आंतरराष्ट्रीय संबंध आणि सामरिक अध्ययन केंद्र या दोन्ही नवीन केंद्रांच्या अभ्यासक्रमांना मान्यता देण्यात आली आहे. भौतिकशास्त्र विभागाच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त ‘व्हर्च्युअल सेंटर ऑफ एक्सलेन्स इन थेरॉटिकल अँड कम्प्युटेशनल फिजिक्स’ या केंद्राच्या स्थापनेसही मंजुरी मिळाली आहे.

शैक्षणिक वर्षाच्या वेळापत्रकाबाबत सुद्धा बैठकीत चर्चा करण्यात आली. शैक्षणिक वर्षाची घडी सुरळीत बसविण्यासाठी शैक्षणिक सत्र निश्चित करण्यात आले आहे. यानुसार कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखांसाठी १४ जून ते ३० ऑक्टोबर २०२१ प्रथम सत्र, १५ नोव्हेंबर ते १ मे २०२२ दुसरे सत्र निश्चित करण्यात आले असून यामध्ये दिवाळी, नाताळ, आणि गणपती सणांच्या सुट्ट्यांचेही विशेष नियोजन करण्यात आले आहे. पुढील शैक्षणिक वर्षाची सुरुवात १२ जून २०२२ पासून होणार आहे.



हेही वाचा -

मुंबईतून पाऊस गायब; ०.० पावसाची नोंद

डेक्कन एक्स्प्रेसच्या व्हिस्टाडोम कोचला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा