Advertisement

विद्यार्थ्यांनो, प्रमाणपत्रांवर छापून येण्याआधी नावं तपासा..!


विद्यार्थ्यांनो, प्रमाणपत्रांवर छापून येण्याआधी नावं तपासा..!
SHARES

मुंबई विद्यापीठाने पदवी प्रमाणपत्रावरील विद्यार्थ्यांच्या नावात घोळ होऊ नये, म्हणून यंदा चांगलीच खबरदारी घेतली आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांची नावे पडताळणीसाठी  www.mu.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली अाहेत. प्रमाणपत्रांवर नावं छापून येण्याआधी तपासा, असं आवाहनही मुंबई विद्यापीठाने विद्यार्थ्यांना केलं आहे. ही नावे २६ डिसेंबरपासून ३१ डिसेंबरपर्यंत संध्याकाळी ५ वाजेपर्यंत तपासता येतील.


अशी सुधारा नावातली चूक

मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने काढलेल्या परिपत्रकानुसार, विद्यार्थ्यांनी या संकेतस्थाळावर आपल्या नावाची पडताळणी करायची आहे. त्यात काही चुका आढळल्यास संकेतस्थळावरील सूचनांप्रमाणे कार्यवाही करून आपल्या मराठी नावात बदल करायचा आहे.



मराठी नावांतील चुका टळतील

ही सूचना विद्यापीठाने विद्यार्थ्यांसोबतच विद्यापीठांच्या विविध शैक्षणिक विभागांचे प्रमुख, संलग्नित महाविद्यालयांचे प्राचार्य यांनाही केली आहे. मुंबई विद्यापीठाच्या यंदाच्या दीक्षांत समारंभात तरी मराठीतील नावांच्या चुका होणार नाहीत, अशी अपेक्षा पालक आणि विद्यार्थ्यांकडून व्यक्त होत आहे.


मागच्या चुकांतून धडा

मागील वर्षी बीएमएमच्या विद्यार्थिनीच्या पदवी प्रमाणपत्रात तिच्या आडनावाचं चक्क भाषांतर करण्यात आलं होतं. nikita kite नावाच्या विद्यार्थिनीचं नाव मराठीत लिहिताना चक्क 'निकिता पतंग' असं लिहिण्यात आलं होतं.



हेही वाचा-

कॉलेज बंक आता अशक्य! बायोमेट्रिक हजेरी लावावी लागणार!

एम.ए, एम.कॉमच्या विद्यार्थ्यांना दिलासा, परीक्षा महिनाभर पुढे ढकलल्या!


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा