Advertisement

शिक्षकांना मिळणार ऑनलाईन पेपर तपासणीचं ट्रेनिंग


शिक्षकांना मिळणार ऑनलाईन पेपर तपासणीचं ट्रेनिंग
SHARES

दरवर्षी उत्तरपत्रिकांच्या तपासणीसाठी लागणारा वेळ, त्यामुळे रखडलेले निकाल यावर उपाय म्हणून उत्तरपत्रिकांची ऑनलाईन तपासणी होणार अशी घोषणा मुंबई विद्यापिठाचे कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांनी केली. या घोषणेनंतर विविध स्तरातून या निर्णयाचा विरोध करण्यात आला. मात्र तरीही विद्यापिठाने ऑनलाईन तपासणीसाठी प्रक्रिया सुरू केली. उत्तरपत्रिका ऑनलाईन तपासणीसाठी शिक्षकांना विशेष ट्रेनिंग देण्यात येणार आहे. 24 एप्रिल ते 28 एप्रिल या कालवधीत हे ट्रेनिंग शिक्षकांना दिले जाईल. 50 वेगवेगळ्या सेंटरवर या ट्रेनिंगची व्यवस्था करण्यात आली आहे.

ऑनलाइन मूल्यांकनाच्या नावाखाली विद्यापिठाने फी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. ऑनलाइन मूल्यांकनाच्या प्रक्रियेमुळे येत्या शैक्षणिक वर्षापासून महाविद्यालयांमध्ये पदवी, पदव्युत्तर आणि एमफिल, पीएचडी अशा अभ्यासक्रमांच्या परीक्षांची फी वाढणार आहे. ऑनलाईन असेसमेंटमुळे उत्तरपत्रिकांच्या तपासणीच्या खर्चात वाढ होणार आहे. त्यामुळे परीक्षा फी वाढवण्याचा निर्णय व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत घेण्यात आला. विद्यापिठाच्या या निर्णयाचा भार आता विद्यार्थ्यांना सोसावा लागणार आहे.

संबंधित विषय
Advertisement