विद्यापिठानेही फी वाढवली

 Kalina
विद्यापिठानेही फी वाढवली
Kalina, Mumbai  -  

ऑनलाइन मूल्यांकनाच्या नावाखाली विद्यापिठाने फी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई विद्यापिठाचे कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांनी विद्यापिठातील सर्व परीक्षांच्या उत्तरपत्रिकांचे ऑनलाइन असेसमेंट करण्याची घोषणा केली आहे. ऑनलाइन मूल्यांकनाच्या प्रक्रियेमुळे येत्या शैक्षणिक वर्षापासून महाविद्यालयांमध्ये पदवी, पदव्युत्तर आणि एमफिल, पीएचडी अशा अभ्यासक्रमांच्या परीक्षांची फी वाढणार आहे.

ऑनलाईन असेसमेंटमुळे उत्तरपत्रिकांच्या तपासणीच्या खर्चात वाढ होणार आहे. त्यामुळे परीक्षा फी वाढवण्याचा निर्णय व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत घेण्यात आला. विद्यापिठाच्या या निर्णयाचा भार आता विद्यार्थ्यांना सोसावा लागणार आहे.

सध्या अभ्यासक्रमासाठी विद्यापिठाकडून 650 रुपये फी आकरण्यात येते. मात्र आता नवीन निर्णयानुसार एक हजारापर्यंत वाढ करण्यात येणार आहे. मात्र या निर्णयाला विद्यार्थी संघटनांनी तीव्र विरोध केला आहे. विद्यापिठाने केलेल्या सरसकट वाढीला विरोध आहे. आधी कॉलेजमध्ये सुविधा द्या, लेक्चर वेळेवर घ्या आणि मगच फी वाढ करा. फी वाढीचा पुर्नविचार विद्यापिठाने करावा नाहीतर आंदोलन करू, असा इशारा युवासेनेचे सुरज चव्हाण यांनी दिला.

Loading Comments