Advertisement

मुंबई महापालिकेत आता केंब्रिज बोर्डाच्याही शाळा : आदित्य ठाकरे

मुंबई महापालिकेच्या शाळेत केंब्रिज बोर्ड सुरू करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

मुंबई महापालिकेत आता केंब्रिज बोर्डाच्याही शाळा : आदित्य ठाकरे
SHARES

मुंबई महापालिकेच्या शाळेत केंब्रिज बोर्ड सुरू करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. पर्यटनमंत्री आणि मुंबईचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी ही माहिती दिली आहे.

सीबीएसई, आयसीएसई शाळा सुरू केल्यानंतर आता मुंबई महापालिकेच्या शाळेत केंब्रिज बोर्डाचं शिक्षण घेता येईल असंही त्यांनी यावेळी सांगितलं. तसंच मुंबईच्या प्रत्येक वॉर्डात शाळा सुरू करण्याचा प्रयत्न असल्याचं त्यांनी पुढे सांगितलं.

“आज आपण केंब्रिज बोर्डाचा एक महत्त्वाचा पल्ला पार करत आहोत. पुढचे दोन महिने यांच्यासोबत बसून यात किती शाळा आपण घेऊ शकतो. सुरुवातीला एक शाळा जरी असेल. तरी प्रत्येक वॉर्डमध्ये कमीत कमी एक शाळा तरी करू शकू का? जेणेकरून जास्तीत जास्त विद्यार्थी याचा फायदा करून घेऊ शकतील. विद्यार्थ्यांना करिअर, रिसर्चसाठी भविष्यात फायदा होईल.”, असं पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितलं.

२०१३ मध्ये आपण व्हर्चुअल क्लासरुमची संकल्पना महापालिका शाळांमध्ये प्रत्यक्षात आणण्यात आली आहे. तसंच सीबीएसई, आयसीएसई बोर्डाशीही काही शाळांची संलग्नता करण्यात आली, त्याच पद्धतीनं केंब्रिज बोर्डासमवेतही संलग्नता करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.

आदित्य ठाकरे म्हणाले की, "मुंबई पब्लिक स्कुलमध्ये यापूर्वीच सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डाचे मोफत अभ्यासक्रम सुरू झाले आहेत. आता आंतरराष्ट्रीय बोर्डाचा अभ्यासक्रमही सुरू करण्यात येणार आहे. महापालिका आपल्या शाळांमध्ये शालेय अभ्यासक्रमाबरोबरच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी खेळांसारख्या इतर उपक्रमांनाही प्रोत्साहन देत आहे."

शाळांच्या इमारती आणि पायाभूत सुविधा अद्ययावत करण्यावरही महापालिकेचा भर आहे. विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच सहसाहित्यही मोफत पुरवण्यात येत आहे. या शाळांमधील दर्जेदार शिक्षणामुळे चालू शैक्षणिक वर्षात चार हजार विद्यार्थी संख्येसाठी दहा हजारांहून अधिक अर्ज प्राप्त झाल्यानं लॉटरी पद्धत अनुसरावी लागली हे या शाळांचं यश असल्याचं त्यांनी सांगितलं.

यापूर्वी पालिकेच्या शाळांबद्दल जनतेच्या मनात सकारात्मक दृष्टिकोन निर्माण व्हावा याकरिता पालिका शाळांचे नाव बदलण्याचा निर्णय घेण्यात आला होता. प्राथमिक विभागाच्या ९६३ आणि माध्यामिक विभागाच्या २२४ मनपा शाळांच्या मूळ नावासह मुंबई पब्लिक स्कूल असे संबोधण्यात येत आहे. त्याकरिता नवीन बोधचिन्ह तयार करण्यात आले आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या पब्लिक स्कुलमध्ये आंतरराष्ट्रीय बोर्डाचा शैक्षणिक अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी केंब्रिज विद्यापीठाचे सहकार्य मिळण्यासंदर्भात आज सह्याद्री अतिथीगृह येथे सहमतीचा करार झाला.

यावेळी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, शिक्षण समिती सभापती संध्या दोशी, अतिरिक्त आयुक्त सुरेश काकानी, सह आयुक्त अजित कुंभार, केम्ब्रिज दक्षिण आशिया चे विभागीय संचालक महेश श्रीवास्तव, शिक्षण तज्ज्ञ फ्रान्सिस जोसेफ, केम्ब्रिज विद्यापीठ प्रेस हेड अजय प्रताप सिंग, महानगरपालिकेचे शिक्षण अधिकारी राजू तडवी आदी यावेळी उपस्थित होते.



हेही वाचा

CET परीक्षांच्या तारखा जाहीर, 'या' कालावधीत होणार परीक्षा

राज्यातील 'इतक्या' शासकीय शाळा आदर्श शाळा होणार

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा