सिडनॅहममध्ये 'मुरंजन'ची सुरुवात

 Churchgate
सिडनॅहममध्ये 'मुरंजन'ची सुरुवात

चर्चगेट - सिडनॅहम महाविद्यालयात ड्रॅमेटीकल सोसायटीच्याच्या वतीने 'मुरंजन' या नाट्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले अाहे. हा महोत्सव 4 जानेवारी ते 6 जानेवारी दरम्यान होणार आहे. या महोत्सवाचे माध्यम प्रायोजक ‘मुंबई लाइव्ह’ असून या महोत्सवात चर्चासत्र, व्याख्यानमाला, अभिप्राय लेखन, पथनाट्य, प्रहसन अशा गोष्टींची मजा या निमित्ताने अनुभवायला मिळणार आहे. त्यात एकांकिकांची स्पर्धा ही येथे रंगणार आहे. प्रथम क्रमांकास 25,000 रुपये आणि व्दितीय, तृतीय क्रमांकास अनुक्रमे 15,000आणि 10,000 असा क्रम असणार आहे. या महोत्सवास विविध सिलेब्रिटी देखील हजेरी लावणार आहेत.

Loading Comments