Advertisement

कविकुलगुरु कालिदास संस्कृत विद्यापीठाअंतर्गत रत्नागिरी उपकेंद्राचं काम तातडीने पूर्ण करा- उदय सामंत

कविकुलगुरु कालिदास संस्कृत विद्यापीठ, रामटेक, नागपूर अंतर्गत रत्नागिरी येथे उपकेंद्र तातडीने सुरू करण्यासाठी आवश्यक त्या बाबींची पूर्तता करून उपकेंद्राच्या कामाला गती द्यावी, अशा सूचना उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी केल्या.

कविकुलगुरु कालिदास संस्कृत विद्यापीठाअंतर्गत रत्नागिरी उपकेंद्राचं काम तातडीने पूर्ण करा- उदय सामंत
SHARES

कविकुलगुरु कालिदास संस्कृत विद्यापीठ, रामटेक, नागपूर अंतर्गत रत्नागिरी येथे उपकेंद्र तातडीने सुरू करण्यासाठी आवश्यक त्या बाबींची पूर्तता करून उपकेंद्राच्या कामाला गती द्यावी, अशा सूचना उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी केल्या.

आज मंत्रालयात याबाबत आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीला रत्नागिरी जिल्हाधिकारी बी. एन. पाटील, कविकुलगुरु कालिदास संस्कृत विद्यापीठ कुलगुरू श्रीनिवास वरखेडी, संबंधित अधिकारी उपस्थित होते.

उदय सामंत म्हणाले, उपकेंद्रासाठी लागणारी जमीन उपलब्ध करून देण्यात येईल.या उपकेंद्राचे काम तातडीने सुरू होणे आवश्यक आहे. रत्नागिरी उपकेंद्र स्वयंपूर्ण होण्यासाठी पर्यटन विकास महामंडळ यांच्याशी समन्वय करून बीएस्सी.हॉस्पिटॅलिटी स्टडीज हा अभ्यासक्रम सुरू केल्यास रत्नागिरी परिसरातील पर्यटन क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना लाभ होईल. तसेच स्थानिकांना रोजगार उपलब्ध होऊन प्रशिक्षित मनुष्यबळाची निर्मिती होईल.

या उपकेंद्रामध्ये सन २०२१-२२  करिता एम.ए.(संस्कृत, योगशास्त्र,ज्योतिषशास्त्र), बी.ए.(योगशास्त्र), बीसीसीए पदविका (संस्कृत,योग, वास्तुशास्त्र)

सन २०२२-२३पासून सुरू होणार अभ्यासक्रम

बी. एस्सी.(हॉपिटॅलिटी स्टडीज),बी.बी.ए,बी.ए,(सिव्हील सर्व्हिसेस, कौशल्य विकासोन्मुख अभ्यासक्रम.सुरू करण्यात येणार आहेत. याबाबतही बैठकीत चर्चा करण्यात आली.

हेही वाचा-

प्रदर्शनापूर्वीच फिरस्त्यावर पुरस्कारांचा वर्षाव

रत्नागिरी जिल्ह्यात उर्दू भवन उभारणार – उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा