Advertisement

पालघर विद्यापीठाचे नवीन उपकेंद्र?


पालघर विद्यापीठाचे नवीन उपकेंद्र?
SHARES

पालघर जिल्ह्यात मुंबई विद्यापीठाचे उपकेंद्र सुरू होणार आहे. मुबई विद्यापीठावरचा भार यामुळे कमी होणार आहे. याबाबत लवकरच अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे. यावर्षी निकालात झालेल्या गोंधळानंतर मुंबई विद्यापीठाने हा निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

मुंबई विद्यापीठात संलग्नित कॉलेजची संख्या सातशेहून अधिक आहे. सात लाखाहून अधिक विद्यार्थी संख्या आहे. याचा भार पूर्ण मुंबई विद्यापीठावर येतो. एवढ्या मोठ्या संख्येने संलग्नित कॉलेज असणारे मुंबई विद्यापीठ हे एकमेव विद्यापीठ आहे. त्यामुळे मुंबई विद्यापीठाने आपला भार हलका करण्यासाठी उपकेंद्रे सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची होणारी दमछाक आता कमी होईल.


विद्यार्थ्यांनाही दिलासा

विद्यापीठाच्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यांनाही दिलासा मिळणार आहे. परीक्षा, निकाल, प्रवेश अशा कारणांसाठी विद्यार्थ्यांना आता कलिना विद्यापीठ गाठावे लागणार नाही.


प्रस्तावित उपकेंद्रे

या आधी विद्यापीठाने ठाणे, कल्याण आणि रत्नागिरी या ठिकाणी मुंबई विद्यापीठाचे उपकेंद्र सुरू करण्याबाबत निर्णय घेतला होता. मात्र, अद्याप ही केंद्रे सुरू करण्यात आलेली नाही. जर ही उपकेंद्रे सुरू झाली, विद्यापीठावरचा प्रशासकीय आणि शैक्षणिक भार हलका होईल.


आता पालघर होणार उपकेंद्र

पालघर येथे विद्यापीठाचे उपकेंद्र सुरू झाले, तर आजूबाजूच्या ४० कॉलेजला त्याचा फायदा होणार आहे. शिवाय पालघर हा आदिवासी भाग येत असल्यामुळे अदिवासी भागातील विद्यार्थ्यांच्या विकासाला चालना मिळेल. आदिवासी मुलांच्या विकासासाठी उपयुक्त अनेक नवीन कोर्स विद्यापीठात सुरू करण्यात येतील.



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा