Advertisement

बीए, बीकाॅमच्या विद्यार्थ्यांनो यंदा पास व्हाच, नाहीतर...


बीए, बीकाॅमच्या विद्यार्थ्यांनो यंदा पास व्हाच, नाहीतर...
SHARES

सतत नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांनो आता सावधान. पुन्हा नापास झालात तर महागात पडेल. कारण पुढच्या वर्षापासून नापास विद्यार्थ्यांना नवीन अभ्यासक्रमानुसार पेपर द्यावे लागतील. त्यामुळे नापास विद्यार्थ्यांना जुन्या अभ्यासक्रमानुसार परीक्षा देण्याची ही शेवटची संधी असेल.

मुंबई विद्यापीठातून पदवी घेणाऱ्या बीए, बीकॉम आणि बीएससीच्या तिसऱ्या वर्षाच्या नापास विद्यार्थ्यांना जुन्या अभ्यासक्रमानुसार परीक्षा देण्याची मुभा दिली जाते. या विद्यार्थ्यांसाठी जुन्या अभ्यासक्रमानुसार प्रश्नपत्रिका काढणं, स्वतंत्ररित्या उत्तरपत्रिका तपासण्यासाठी स्वतंत्र कर्मचाऱ्यांची नेमणूक केली जाते. मात्र तरीही अनेक विद्यार्थी या परीक्षांमध्ये नापास होतात.    

मात्र आता या नापास विद्यार्थ्यांना जुन्या अभ्यासक्रमानुसार परीक्षा देता येणार नसल्याचा निर्णय अॅकेडमिक काऊन्सिलमध्ये घेण्यात आला. नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांना आता चालू अभ्यासक्रमानुसार परीक्षा द्यावी लागणार आहे. लवकरच हा निर्णय विद्यापीठाकडून जाहीर करण्यात येईल. त्यामुळे या वर्षी कुठला विद्यार्थी नापास झाल्यास त्यांला नवीन अभ्यासक्रमानुसार परीक्षा द्यावी लागेल.



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा