Advertisement

शालेय उपयोगी वस्तूंपासून विद्यार्थी वंचित


SHARES

अॅन्टॉप हिल- एकीकडे पालिका विद्यार्थ्यांच्या दप्तराचं ओझं कमी करण्यासाठी टॅब वाटप करतेय... तर दुसरीकडे पालिका शाळेतले विद्यार्थी शाळा सुरू होऊन 5 महिने झाले तरी शैक्षणिक साहित्य कधी मिळेल, याची वाट बघतायत... अँटॉप हिलच्या काणेनगर पालिका शाळेतल्या विद्यार्थ्यांची ही अवस्था आहे... या शाळेत उर्दू माध्यमातल्या आठवीच्या 250 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना पेन्सिल, वह्या, बूट, गणवेश, छत्री, रेनकोट अशा एकूण 27 वस्तू अजूनही मिळालेल्या नाहीत. काही दिवसांतच सर्व विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचं वाटप करण्यात येईल, असं आश्वासन पालिकेच्या एफ उत्तर विभागाचे शिक्षण अधिकारी किसन केंकरे यांनी दिलंय. ते पूर्ण होतं का, हे काळच स्पष्ट करेल.

 

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा