Advertisement

मुंबई विद्यापीठात इन्क्युबेशन सेंटरचे उद्घाटन


मुंबई विद्यापीठात इन्क्युबेशन सेंटरचे उद्घाटन
SHARES

मुंबई विद्यापीठातील आजी-माजी विद्यार्थ्यांनी आणि प्राध्यापकांना त्यांच्या नवसंकल्पनातून उद्योग निर्मितीसाठीचे व्यासपीठ मुंबई विद्यापीठानं उपलब्ध करुन दिलं आहे. नोबेल पारितोषिक विजेते सर रिचर्ड जॉन रॉबर्ट्स यांच्या हस्ते बुधवारी इन्क्युबेशन सेंटरचं उदघाटन करण्यात आलं. या इन्क्युबेशन सेंटरच्या उद्घाटनावेळी भौतिकशास्त्र विभागाच्या विभागप्रमुख प्रो. वैशाली बांबोले यांनी अन्न पदार्थ नासू नयेत यासाठी एक सांयटिफिक पद्धतीच्या प्रकल्पाचं सादरीकरण केलं. यानुसार हे पदार्थ तीन वर्षांहून अधिक काळ टिकवता येणार असून ते खाताही येणार आहेत.


काय आहे ही पद्धत

मुंबई विद्यापीठातील प्रथमच इन्क्युबेशन सेंटरचं उद्घाटन केलं आहे. यावेळी विद्यापीठातील विविध विभागप्रमुख व विद्यार्थ्यांनी २० प्रकल्पाच सादरीकरणं केल. यावेळी भौतिकशास्त्र विभागाच्या विभागप्रमुख प्रोफेसर वैशाली बांबोले यांनी एका सायंटिफिक पद्धतीनुसार एखादा पदार्थ तीन वर्षांपेक्षा जास्त काळ टिकू शकतो यासाठी एक युक्ती शोधून काढली आहे. यानुसार नेहमीच्या पद्धतीनं तयार करणाऱ्या पदार्थांवरील पॅकेटवर रेडिएशन आणि थर्मल ट्रीटमेंट करण्यात येईल. ही ट्रीटमेंट केल्यानंतर हे पदार्थ एक हजार दिवस टिकतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.


फंक्शनल नॅनो 

त्याशिवाय या इन्क्युबेशन सेंटरच्या निमित्तानं प्राध्यापक डॉ. प्रविण वाळके यांनी विविध तंत्रज्ञानातील बॅटरीतील उर्जा साठवण्याची क्षमता वाढवण्यासाठी फंक्शनल नॅनो मटेरियलही तयार केले आहेत. यामुळं मोबाईल फोन, चार्जर, खेळण्याच्या वस्तू यांसारख्या विविध ठिकाणी वापरण्यात येणाऱ्या वस्तूंची बॅटरी जास्त वेळ चालणार आणि टिकणार आहे


... म्हणून स्थापना

विद्यार्थी आणि प्राध्यापकांच्या नव्या संकल्पनांना वाव देत नवीन उद्योजक घडवण्यासाठी विद्यापीठात इन्क्युबेशन सेंटरची स्थापना करण्यात आली आहे. यासाठी महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन सोसायटीकडून विद्यापीठाला ५ कोटीचा निधी मंजूर करण्यात आला आहे. महाराष्ट्र स्टेट इनोव्हेटिव्ह स्टार्टअप पॉलीसी-२०१८ च्या अनुषंगानं विद्यापीठानं हे महत्त्वपूर्ण पाऊल उचललं आहे.  



हेही वाचा - 

दीक्षान्त सभारंभातील सुवर्णपदकांवर मुलींची बाजी

विद्यापीठाच्या परीक्षा विभागाच्या संचालकपदी कोण?




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा