Advertisement

विनाअनुदानित शाळेतील शिक्षकांचे उपोषण मागे


विनाअनुदानित शाळेतील शिक्षकांचे उपोषण मागे
SHARES

एकीकडे राज्य शासनाने सातवा वेतन आयोग देण्याची घोषणा केली आहे. पण दुसरीकडे मात्र अनेक विनाअनुदानित शाळांमधील शिक्षकांना सहावा वेतन आयोगच मिळताना दिसत नाही. याबबात मंगळवारी शिक्षकदिनाच्या निमित्ताने शिक्षण परिषदेतर्फे उपोषण करण्यात येणार होते. मात्र हे उपोषण तूर्तास स्थगित करण्यात आले आहे.

शिक्षकांच्या सहाव्या वेतन आयोगाबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन शिक्षण निरीक्षकांनी शिक्षण परिषदेला दिले. या आश्वासनानंतर हे उपोषण मागे घेण्यात आले आहे.

मुंबईत उत्तर, दक्षिण आणि पश्चिम विभागात सुमारे सहाशेहून अधिक विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित, सेल्फ फायनान्स्ड केंद्रीय शाळा आणि महाविद्यालये आहेत. यातील अनेक शाळांमध्ये शिक्षकांना शासनाच्या नियमाप्रमाणे वेतन आणि भत्ते दिले जात नाहीत.


अनेक शाळा व्यवस्थापनाने शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सहावा वेतन आयोग द्यायचा असल्याने पालकांकडून वाढीव शुल्क देखील वसूल केले आहे. परंतु, प्रत्यक्षात मात्र शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कोणत्याही प्रकारे वेतन वाढ देण्यात आलेली नाही. शिक्षण निरीक्षकांनी सुनावणी घेऊन निर्णय देणार असल्याचे लेखी आश्वासन दिले आहे.

अनिल बोरनारे, शिक्षक परिषद



हेही वाचा - 

आदर्श शिक्षक पुरस्कारांची घोषणा कधी होणार?


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा