SHARE

अकरावी सोबतच आता 12 वीची प्रवेश प्रक्रिया देखील ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येणार आहे. येत्या शैक्षणिक वर्षापासून (2017- 18) पासून कॉलेज बदलणाऱ्यांसाठी प्रवेश ऑनलाईन करण्यात येणार आहे. 

ज्यांना अकरावीमध्ये घरापासून लांब असलेल्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला आहे,ज्यांच्या पालकांची बदली झाली आहे, तसेच ज्या विद्यार्थ्यांना 12 वीसाठी आपली शाखा बदलायची आहे अशा विद्यार्थ्यांना 12 वी साठी ऑनलाईन प्रवेश घेणं अनिवार्य आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज बदलायचे आहे,अशा विद्यार्थ्यांना फी भरण्याची सक्ती करू नये, तसेच विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रवेश मिळाल्यानंतरच ज्या कॉलेजमध्ये त्या विद्यार्थ्याला प्रवेश मिळाला आहे, त्याच कॉलेजने 12 वीची फी लागू करावी, असा आदेश शिक्षण उपसंचालक बी.बी.चव्हाण यांनी दिला आहे. 

जून महिन्यात 12 वी च्या कॉलेज प्रवेशाला सुरूवात होणार आहे. मात्र अद्याप 12 वीच्या ऑनलाईन प्रवेशाच्या तारखा जाहीर झालेल्या नाहीत. त्यामुळे ऑनलाईन प्रवेश कधी सुरू होणार? याबाबत पालक आणि मुलांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

संबंधित विषय
ताज्या बातम्या