Advertisement

आता शाळांच्या सहली फक्त ऐतिहासिक ठिकाणीच


आता शाळांच्या सहली फक्त ऐतिहासिक ठिकाणीच
SHARES

येत्या शैक्षणिक वर्षापासून शाळेच्या सहली फक्त ऐतिहासिक ठिकाणीच घेऊन जाव्यात असं परिपत्रक शिक्षण विभागानं काढलं आहे. शाळा आपल्या सहलींसाठी नेहमी रिसॉर्ट, वॉटरपार्क, संग्रहालय याची निवड करतात. मुलांना अभ्यासाच्या ताणातून मुक्तता मिळावी, यासाठी अशा ठिकाणांची निवड शाळा करत असतात. मात्र आता येत्या शैक्षणिक वर्षापासून शाळांना ऐतिहासिक ठिकाणी सहल नेणं अनिवार्य आहे. राज्यातील पर्यटनाला चालना मिळावी यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. याआधी पर्यटन विभागाने शालेय सहली ऐतिहासिक महत्व असणाऱ्या ठिकाणी काढव्यात अशी विनंती शालेय विभागाला केली होती.

या सहलींसाठी विद्यार्थ्यांवर कोणत्याच प्रकारची सक्ती करण्यात येणार नसल्याचं विभागानं स्पष्ट केलंय. 5 वी ते 10 वी च्या विद्यार्थ्यांसाठी ऐतिहासिक ठिकाणी सहल काढण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना ऐतिहासिक विषयाची ओळख होणे हा या सहलीमागचा मुख्य उद्देश आहे.

या शासन निर्णयात विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी नेमकी काय काळजी घ्यावी याविषयी उल्लेख नाही. त्याचा दर्जा निश्चित केलेला नाही. या सहलीसाठी नेमकी किती फी अाकरावी याबद्दल नमूद केलेले नाही. त्यामुळे शाळा पालकांची लूट करू शकतात. 

- जयंत जैन, अध्यक्ष, फोरम फॉर फेअरनेस एज्युकेशन

शिक्षण विभागाच्या या निर्णयाचे शिक्षक आणि मुख्याध्यापकांनी स्वागत केले आहे. यानिमित्ताने विद्यार्थ्यांना ऐतिहासिक ठिकाणांची ओळख होईल आणि त्यांचे रिसॉर्टचे वेड कमी होईल, असे मत मुंबई मुख्याध्यापक संघटनेचे अध्यक्ष प्रशांत रेडिज यांनी मांडले.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा