SHARE

काही दिवसांपूर्वी शिक्षण विभागाने 12 वी प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन होणार असं जाहीर केलं होतं. कॉलेज सुरू व्हायला काही दिवस बाकी राहिले आहेत. मात्र अजूनही 12 वीच्या ऑनलाईन प्रवेशाची तारीख जाहीर झालेली नाही. त्यामुळे 12 वीचे वर्ग सुरू होण्यास उशीर होणार असं चित्र दिसतंय. त्यातच येत्या शैक्षणिक वर्षांपासून (2017- 18) कॉलेज बदलणाऱ्यांसाठीही प्रवेश प्रकिया ऑनलाईन करण्यात येणार आहे. 

4 मे 2017 ला 12 वी प्रवेश ऑनलाईन होणार असं शिक्षण विभागाने जाहीरही केलं होतं. तसेच ज्यांना अकरावीमध्ये घरापासून लांब असलेल्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला आहे, ज्यांच्या पालकांची बदली झाली आहे, तसेच ज्या विद्यार्थ्यांना 12 वीसाठी आपली शाखा बदलायची आहे अशा विद्यार्थ्यांनाही 12 वी साठी ऑनलाईन प्रवेश घेणं अनिवार्य असल्याचं सांगण्यात आलं होतं. मात्र अजूनही 12 वी ऑनलाईन प्रवेशासाठीच्या वेबसाईटचे काम सुरू आहे. वेबसाईटचे काम पूर्ण झाल्यावरच ऑनलाईन प्रवेशाच्या तारखा घोषित केल्या जातील. वेबसाईट पूर्ण होणाच्या कामाला वेळ लागेल. लवकरात लवकर वेबसाईटचं काम पूर्ण करण्यात येईल. मे महिना अखेरीस 12 वी प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत, असं शिक्षण उपसंचालक बी. बी. चव्हाण यांनी सांगितलं. त्यामुळे तूर्तास तरी 12वीच्या विद्यार्थ्यांना प्रतिक्षा करावा लागणार आहे.

संबंधित विषय
ताज्या बातम्या