Advertisement

आता ऑनलाईन मिळणार शिष्यवृत्ती


आता ऑनलाईन मिळणार शिष्यवृत्ती
SHARES

शासनतार्फे राबवल्या जाणाऱ्या शिष्यवृत्या आता ऑनलाईन होऊ लागल्या आहेत. शिक्षण संचलनालयातर्फे अर्थिकदृष्ट्या दुर्बल व होतकरू विद्यार्थ्यांसाठी दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्या आता थेट विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत.

या शिष्यवृत्तीसाठी ऑनलाईन अर्ज करायचा आहे. या ऑनलाईन अर्जामध्ये अधारक्रमांक नमूद करावा लागणार आहे. आधार कार्ड ज्या बँक खात्याशी संलग्नित असेल, त्या बँक खात्यामध्ये विद्यार्थ्यांची शिष्य़वृत्ती जमा करण्यात येईल.


विद्यार्थ्यांसाठी पात्रता निकष

ज्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शालांत परीक्षेत ५० टक्के किंवा त्याहून अधिक गुण मिळाले आहेत, अशा विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. त्याचबरोबर या विद्यार्थ्यांना अकरावीच्या परीक्षेत ५० टक्के गुण मिळाल्यास या विद्यार्थ्यांना बारावीपर्यंत ही शिष्यवृत्ती मिळू शकते. मात्र, पालकांंचे वार्षिक उत्पन्न ३० हजारपेक्षा जास्त नसावे अशी अट या शिष्यवृत्तीसाठी ठेवण्यात आली आहे.


या संकेतस्थळावर करा शिष्यवृत्तीसाठी अर्ज

जे विद्यार्थी या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करणार आहेत. त्या विद्यार्थ्यांनी www.mahadbt.gov.in या संकेतस्थळावर अर्ज करायचा आहे.


मोबाईल नंबर आधारशी संलग्नित आवश्यक

ज्या विद्यार्थ्यांनी या शिष्यवृत्तीसाठी अर्ज केला आहे, त्यांचा मोबाईल नंबर आधार कार्डशी संलग्नित असणे आवश्यक आहे. शिष्यवृत्तीचा अर्ज भरताना 'वेबसाईटवर याविषयी सर्व सूचना देण्यात आल्या आहेत. त्या सूचनांचे पालन करावे,' असे आवाहन शिक्षण संचलनालयातर्फे करण्यात आले आहे.



हेही वाचा

धक्कादायक! ३,७०० प्राध्यापकांनी एकही उत्तरपत्रिका तपासली नाही!


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा