Advertisement

ठाण्यातील शिक्षकांसाठी ऑनलाईन प्रशिक्षण कार्यक्रमाचं आयोजन

अ‍ॅडस्कार्क इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेडच्या वतीनं शालेय शिक्षकांना प्रशिक्षण देण्यासाठी एकात्मिक प्रकल्प नुकताच घेण्यात आला.

ठाण्यातील शिक्षकांसाठी ऑनलाईन प्रशिक्षण कार्यक्रमाचं आयोजन
SHARES

अ‍ॅडस्कार्क इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेडच्या वतीनं शालेय शिक्षकांना प्रशिक्षण देण्यासाठी एकात्मिक प्रकल्प नुकताच घेण्यात आला. ठाण्यातल्या  आश्रमशाळेत अ‍ॅम्परसँड ग्रुपच्या मालकीची शाळेत कार्यक्रम आयोजित करण्यात आला. 

शिक्षकांच्या क्षमता वाढीसाठी शाश्वत गुणवत्ता प्रशिक्षण आणि तंत्रज्ञान-सक्षम सोल्यूशन्सद्वारे सतत व्यावसायिक विकास मिळवणं हा या कार्यक्रमाचा उद्देश होता. ठाणे विभाग, आदिवासी विकास विभाग, महाराष्ट्र शासनाच्या अतिरिक्त आयुक्त कार्यालयानं थेम्बा, सुसारवाडी, शेणवा, मध, डहागाव, अंबिवली इथं असलेल्या शेजारच्या आश्रमशाळांमधील अनुभवी आणि नवीन प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांची यासाठी निवड केली. 

या कार्यक्रमात भाग घेण्यासाठी ठाण्यातील अनेक लहान गावातील शिक्षकांचा समावेश होता. या विषयाच्या चांगल्या आणि प्रभावी समजण्यासाठी प्रत्येक कोर्सचे विभाग विभागले गेले. कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी, शिक्षकांना भेडसावणाऱ्या आव्हानांचा आढावा घेण्यासाठी सुमारे ६० शिक्षक आणि १० मुख्याध्यापकांसह १० शाळांमध्ये सर्वेक्षण केलं गेलं.

आव्हाने आणि गरजा काय आहेत हे समजून घेतलं गेलं. त्या आधारे शिक्षकांसाठी हा प्रशिक्षण अभ्यासक्रम तयार केला गेला. २१व्या शतकातील शिक्षण, अध्यापनशास्त्र आणि मूल्यमापन, बाल विकासाची मूलभूत तत्त्वे, विशेष गरजा यांचे स्पेक्ट्रम, शाळेत सुरक्षा पद्धतीतील मूलभूत गोष्टी, आरोग्य आणि पोषण आणि मूलभूत कौशल्ये या प्रशिक्षण कार्यक्रमांचा यात समावेश होता. तंत्रज्ञानाद्वारे संबंधित विषयांसह शैक्षणिक कौशल्ये सुधारणे हा हेतू होता.

अ‍ॅम्परसँड ग्रुपने केलेल्या सर्वेक्षणात प्रायोगिक प्रकल्पाच्या अगोदरच्या तुलनेत शिक्षकांना माहित  असलेल्या  ज्ञानात २७ टक्क्यांची सुधारणा दिसून आली आहे.

अ‍ॅम्परसँड ग्रुपचे चेअरमन रुस्तम केरावाला म्हणाले, “तंत्रज्ञानाद्वारे सक्षम सोल्यूशनद्वारे शिक्षकांच्या क्षमता वाढीसाठी आणि त्यांच्या सतत व्यावसायिक विकासावर आधारित त्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी शाश्वत गुणवत्ता समाधान प्रदान करणं हा या कार्यक्रमाचा उद्देश होता. हे प्रशिक्षण आदिवासीबहुल भागातील शिक्षकांना आधुनिक पद्धती  शिकण्यास आणि वैज्ञानिक पद्धतीनं विद्यार्थ्यांच्या गरजा भागवण्यास मदत करेल.”



हेही वाचा

प्राध्यापक, कर्मचाऱ्यांना दिलासा, १०० टक्के उपस्थिती बंधनकारक नाही

कला संचालनालय प्रवेशप्रक्रियेचे सुधारित वेळापत्रक जाहीर

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा