Advertisement

घोकंपट्टी बंद होणार..तोंडी परीक्षाच रद्द!


घोकंपट्टी बंद होणार..तोंडी परीक्षाच रद्द!
SHARES

नववी, दहावीच्या विद्यार्थ्यांना टक्केवारी वाढवायला तोंडी परीक्षेच्या 20 गुणांची हमखास मदत व्हायची. पण मदतीला धावून येणारे हे 20 गुण आता संकटात सापडलेल्या विद्यार्थ्यांसाठीही मदतीचा हात पुढे करणार नाहीत.


सरकारचा निर्णय

कारण राज्य सरकारने 80:20 (तोंडी परीक्षा - 20 गुण, लेखी परीक्षा 80 - गुण) हा पॅटर्नच बंद करण्याचे ठरवले असून शालेय शिक्षण विभाग लवकरच यासंदर्भातील अधिकृत निर्णय जाहीर करणार आहे.पैकीच्या पैकी गुण

या वर्षी नववीच्या अभ्यासक्रमात आणि पुढील वर्षी दहावीच्या अभ्यासक्रमात हा बदल करण्यात येईल. दहावीच्या विद्यार्थ्यांना भाषा आणि विज्ञान विषयाचे तोंडी आणि प्रात्यक्षिक परीक्षेचे 20 गुण शाळा देते. अनेक वेळा शाळांकडून पैकीच्या पैकी गुण दिले जातात. त्याने विद्यार्थ्यांचे गुण वाढण्यास मदत होते.


बैठकीत चर्चा

ही मूल्यमापन पद्धत बदलण्यासंदर्भात महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्या अधिकाऱ्यांची नुकतीच बैठक झाली. या बैठकीत 80:20 पॅर्टन बदलण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आला.


सविस्तर माहिती परिपत्रकात

या बाबत शालेय शिक्षण विभागाकडून लवकरच परिपत्रक प्रसिद्ध करण्यात येणार आहे. या वर्षी म्हणजेच 2017-18 या वर्षात दहावीच्या गुणपद्धतीत कोणतेही बदल केले जाणार नाहीत. मात्र या वर्षी 9 वीच्या गुणपद्धतीत हा नियम लागू करणार का? या विषयी सविस्तर माहिती परिपत्रकाद्वारे प्रसिद्ध केली जाणार आहे.
डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

Read this story in हिंदी
संबंधित विषय