Advertisement

आझाद मैदानावर शाळांच्या फी वाढीविरोधात आंदोलन


आझाद मैदानावर शाळांच्या फी वाढीविरोधात आंदोलन
SHARES

मुंबई शहर आणि उपनगरातल्या अनेक शाळांनी फी वाढ केली आहे. पाल्याच्या प्रवेशाबरोबरच शाळा पुस्तके, स्टेशनरी, क्रीडा साहित्यांची किंमत वाजवी दरापेक्षा जास्त आकारून तसेच हे अनिवार्य करून शाळा प्रवेशाच्या नावाखाली पालकांची लूट करत आहेत. या फी वाढीविरोधात फोरम फॉर एज्यूकेशन आणि पालकांनी गुरुवारी आझाद मैदानात आंदोलन केले. यावेळी लोखंडवाला इंटरनॅशनल, युनिवर्सल हायस्कूल, ठाकूर इंटरनॅशनल, आयएस, ओमकार इंटरनॅशनल स्कूल अशा शाळांतील पालक आंदोलनात सहभाग झाले होते.
यावेळी पालकांनी शासना विरुद्ध घोषणा दिल्या. शाळेची मनमानी थांबवा, फी वाढ रद्द करा, पालकांचे शोषण बंद करा, मोदी अंकल आम्हाला वाचवा. अशा अनेक घोषणा पालकांनी यावेळी दिल्या.शाळेतूनच वह्या, पुस्तक, स्केटिंग घेणं अनिवार्य आहे. त्यामुळे या सगळ्यांच्या नावाखाली शाळा जास्तीचे पैसे आमच्याकडून घेते. असे युनिव्हर्सल शाळेच्या पालकांनी सांगितले.

माझी दोन्ही मुलं शांतीनिकेतन शाळेत आहेत. शाळेत प्रवेश फीच्या नावाखाली 40 हजार रुपये घेतले जातात. शासन नियमाप्रमाणे मी फी भरायला तयार आहे. मला शाळेची फी भरण्यास उशीर झाला तर शाळेने माझ्या मुलांना 2 तास दप्तरांसकट उभं ठेवलं. काहीवेळ लायब्ररीत बसवलं. शाळांची मनमानी आता थांबली पाहीजे.
दीपक वाघ, पालक


पालकांनी शाळेच्या विरोधात अनेकदा शिक्षण अधिकारी आणि शिक्षणमंत्र्याकडे तक्रार केली आहे. मात्र अद्याप कोणतीच कारवाई शाळेवर करण्यात आली नाही. आपल्या पाल्याला चांगलं शिक्षण मिळावं यासाठी मध्यम वर्गीय पालक विद्यार्थ्यांना मोठ्या शाळेत घालतात. पण शाळा मोठाल्या फीच्या नावाखाली पालकांना लुबाडतायत. सरकारने यात लक्ष घातलं पाहीजे. यासाठी आज आम्ही आंदोलन केलं.
जयंत जैन - संचालक फोरम फॉर एज्यूकेशन

यावेळी एका लहान मुलाने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींनाच आवाहन केलं

काय आहेत पालकांच्या मागण्या?
1) शासनाने फी स्ट्रक्चर ठरवलं पाहीजे
2) शाळेतूनच वह्या, पुस्तक घेण्याची सक्ती शाळेने करू नये
3) वर्षाची फी एकदम न घेता, दर महिना फी शाळेने घेतली पाहीजे
4) अॅक्टनुसार 2 वर्षानी फी वाढवणे, दरवर्षी फी वाढवू नये.
5) शाळेने सक्तीचे जेवण थांबवावे.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा