कुर्ल्यात दिव्यांग विद्यार्थी पालक मेळावा

 Nehru Nagar
कुर्ल्यात दिव्यांग विद्यार्थी पालक मेळावा

कुर्ला - सर्व शिक्षा अभियान आणि वेक अप इंडिया फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी कुर्ला पूर्व नेहरूनगर येथील स्वामी विवेकानंद हायस्कूलच्या सभागृहात दिव्यांग मुलांच्या पालकांसाठी शिक्षण आणि करिअरसंबंधीची माहिती देण्याच्या उद्देशाने दिव्यांग विद्यार्थी पालक मेळावा आयोजित करण्यात आला होता.

कुर्ला येथे पार पडलेल्या या मेळाव्यात मुलांना आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या स्वयंभू बनविण्यासाठी तसेच विविध शैक्षणिक माहिती देण्यासाठी पालकांना आणि तज्ज्ञांना एकत्र आणले होते. यात जवळजवळ 300 पालकांनी हजेरी लावली होती. त्यांनी उपस्थित तज्ज्ञांशी संवाद साधला. त्यात शिक्षण निरीक्षक उत्तर विभाग अनिल साबळे, सर्व शिक्षा अभियान उत्तर विभाग विशेष शिक्षक सुलभा करुणानिधी, व्यवसाय उपचार तज्ज्ञ छाया शहा, स्त्रीरोग तज्ञ साशा कोठारी, विशेष शिक्षक कनिका कोहली आणि रमन शंकर आदी तज्ज्ञांनी या मेळाव्यात मार्गदर्शन केले. यावेळी मुलांचे संगोपन आणि त्यांची काळजी, दिव्यांग मुलांचे पालनपोषण ते शिक्षणाचा हक्क, लैंगिक शिक्षण, संवादात्मक शिक्षणाच्या संधी आणि भविष्यातील करिअरच्या संधी अशा अनेक विषयांवर चर्चा झाली.

Loading Comments