Advertisement

फी वाढीविरोधात पालक एकत्र येणार


फी वाढीविरोधात पालक एकत्र येणार
SHARES

सरकारचा अंकुश नसल्याने खासगी शाळा अव्वाच्या सव्वा फी वाढ करतात. अनेक खासगी शाळांनी 25 ते 30 टक्के फी वाढ केली आहे. या जाचक फी वाढीच्या विरोधात मुंबईतील पालक एकत्र येणार आहेत. सरकारचे लक्ष वेधण्यासाठी 20 एप्रिलला आझाद मैदानात आंदोलन करणार आहेत.

मुंबई शहार आणि उपनगरातील अनेक खासगी शाळांनी फी वाढ केली आहे. पुस्तके, स्टेशनरी, क्रीडा साहित्य, प्रवेशाच्या नावाखाली या शाळा पालकांची लूट करत आहेत. या फी वाढीविरोधात फोरम फॉर एज्यूकेशन तर्फे पालकांची बैठक घेण्यात आली. या बैठकीला लोखंडवाला इंटरनॅशनल, युनिव्हर्सल हायस्कूल, ठाकूर इंटरनॅशनल, आयएस सारख्या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे पालक उपस्थित होते. यावेळी पालकांनी आंदोलन करण्याचा निर्णय घेतला.

या आधी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची भेट घेतली होती. त्यांना रितसर तक्रारीचे निवेदन दिले होते. शिक्षणमंत्र्यांनी आश्वासनही दिल्यानंतरही अद्याप कोणतीच कारवाई न केल्याबद्दल सरकारचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करणार आहोत.
जयंत जैन, संचालक, फोरम फॉर एज्युकेशन

संबंधित विषय
Advertisement