Advertisement

आता 'भाईयो और बहनोंं' ऐवजी...विद्यार्थ्यांनो!


आता 'भाईयो और बहनोंं' ऐवजी...विद्यार्थ्यांनो!
SHARES

कितीही म्हटलं तरी विद्यार्थ्यांना परीक्षेचं टेन्शन येतंच. आणि मग याच टेन्शनमध्ये अनेक विद्यार्थी तणावाखाली येतात. तर काही जण दुर्दैवाने आत्महत्येचा पर्यायही स्वीकारतात. असे अनेक प्रकार दरवर्षी घडत असतात. सध्या परीक्षांचा हंगाम सुरू आहे. पण विद्यार्थ्यांनो, आता परीक्षांचं टेन्शन घेण्याची गरज नाही. कारण खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी सर तणावमुक्ततेचे धडे देणार आहेत.


१६ फेब्रुवारीला तयार राहा

पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या १६ फेब्रुवारी रोजी देशभरातील शाळा आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांशी सकाळी ११ ते १२ असा एक तास संवाद साधणार आहेत. या संवादामध्ये परीक्षेचा ताण न घेता परीक्षेला कसं सामोरं जावं? या विषयावर हितगुज करणार असल्याची माहिती केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी बुधवारी विविध राज्यातील शिक्षण मंत्री आणि सचिव यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधून दिली.


सोशल मीडियावर जोरदार प्रचार

१६ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या या कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण दूरदर्शनच्या डीडी नॅशनल, डीडी न्यूज आणि डीडी इंडिया चॅनेलमार्फत करण्यात येणार आहे. तसेच, ऑल इंडिया रेडिओसह एफएम चॅनेल, प्रधानमंत्री मानव संसाधन यांच्या वेबसाईटमार्फत लाइव्ह वेब स्ट्रीमिंग, यू ट्यूब चॅनेल लाइव्ह आणि फेसबुक लाइव्हदेखील करण्यात येणार आहे. यादरम्यान पंतप्रधान मोदी सहावीनंतरच्या वर्गातील विद्यार्थ्यांशी संवाद साधणार असल्याने तशा सूचना राज्याचे शिक्षणमंत्री आणि सचिवांना करण्यात आल्या आहेत.


नरेंद्र मोदी पुस्तक रुपात

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुस्तकाच्या माध्यमातूनही देशभरातील विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला आहे. ‘एक्झॅम वॉरिअर्स’ असं या पुस्तकाचं नाव असून या पुस्तकाच्या माध्यमातून परीक्षेच्या काळात येणारा तणाव कसा हाताळावा? याचे धडे ते विद्यार्थ्यांना देणार आहेत. त्यांनी लिहिलेलं ‘एक्झॅम वॉरिअर्स’ हे पुस्तक ३ फेब्रुवारीला प्रकाशित झालं असून यावेळी केंद्रीय परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज आणि केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर उपस्थित होते. सध्या इंग्रजी आणि हिंदी या भाषेत हे पुस्तक उपलब्ध आहे. लवकरच भारतातील विविध भाषेत हे पुस्तक उपलब्ध होणार आहे.


या उपक्रमाचा अधिकाधिक विद्यार्थ्यांना फायदा व्हावा, यासाठी देशभरातील सिनेमागृहांचा वापर करता येईल. या कार्यक्रमात मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी सहभागी होण्यासाठी शाळा आणि महाविद्यालयांनी पुढाकार घेऊन विद्यार्थ्यांनी पंतप्रधान यांचा कार्यक्रम ऐकावा आणि पहावा यासाठी आवश्यक ती सर्व तयारी करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.
विनोद तावडे, शिक्षणमंत्री

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा