Advertisement

'त्या' कवितेबद्दल मनवरांनी मागितली माफी!

या कवितेत आदिवासी समाजाच्या, महिलांच्या भावना दुखावण्यात आल्याचं म्हणत या कवितेवरून मोठा वाद सुरू झाला. या कवितेवरून औरंगाबादचे पत्रकार सुरेश पाटील यांनी वादग्रस्त लेखनही केलं. शेवटी काही संघटनांनी तक्रार केल्यानंतर हा वाद महिला आयोगाच्या दाराशी आला.

'त्या' कवितेबद्दल मनवरांनी मागितली माफी!
SHARES

'पाणी कसं अस्तं' या कवी दिनकर मनवर यांच्या कवितेवरून सुरू झालेला वाद शमण्याची शक्यता आहे. कारण या कवितेबद्दल आणि त्यातून महिलांबाबत जातिविषयक टिप्पणी केल्याबद्दल मनवर यांनी अखेर राज्य महिला आयोगाकडे लेखी माफी मागितली आहे. तर दुसरीकडे मुंबई विद्यापीठाने ही कविता अभ्यासक्रमातून वगळण्याचा निर्णय घेतला आहे.


भावना दुखावल्या

मनवर यांची 'पाणी कसं अस्तं' ही कविता २०१८-१९ ते २०२०-२१ या शैक्षणिक वर्षासाठी महानगरीय जाणिवेचे साहित्य म्हणून मुंबई विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आली होती. मात्र या कवितेत आदिवासी समाजाच्या, महिलांच्या भावना दुखावण्यात आल्याचं म्हणत या कवितेवरून मोठा वाद सुरू झाला. या कवितेवरून औरंगाबादचे पत्रकार सुरेश पाटील यांनी वादग्रस्त लेखनही केलं. शेवटी काही संघटनांनी तक्रार केल्यानंतर हा वाद महिला आयोगाच्या दाराशी आला.


भावना दुखावण्याचा हेतू नाही

या तक्रारीनुसार महिला आयोगानं मनवर यांच्यासह पत्रकार पाटील आणि मुंबई विद्यापीठाला नोटीसा बजावल्या होत्या. या नोटीशीनुसार मनवर यांनी आयोगात व्यक्तिश: हजर राहून विशिष्ट ओळी लिहिताना, लिहिण्याआधी वा लिहिल्यानंतरही माझा कुणाच्याही भावना दुखावण्याचा, स्त्रीवर्गाची अवहेलना करण्याचा कोणताही हेतू नव्हता आणि नाही असं निवेदन दिलं आहे. तर माझ्या कवितेतील एका ओळीमुळे माझ्या बांधवांना आणि भगिनींना मानसिक क्लेश झाला असेल तर मी त्यांची मनापासून माफी मागतो असं त्यांनी स्पष्ट केलं आहे.


विद्यापीठाने मांडली भूमिका

आयोगानं नोटीशीद्वारे मुबंई विद्यापीठालाही या कवितेचा अभ्यासक्रमात समावेश करण्याबाबतची भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार विद्यापीठाचे निबंधक सुनील भिरूड आणि मराठी अभ्यास मंडळ, निमंत्रक डाॅ. सिसिलिया कार्व्हालो यांच्यासह मराठी अभ्यास मंडळाच्या सदस्यांनी आयोगापुढे उपस्थित रहात यासंबंधीचा खुलासा केल्याची माहिती आयोगाकडून देण्यात आली आहे.


अभ्यासक्रमातून वगळली

विद्यापीठाच्या कला शाखेच्या तृतीय वर्षाच्या मराठी विषयाच्या अभ्यास पत्रिका-६ साहित्य आणि समाज मध्ये या कवितेचा समावेश होता. मात्र या कवितेमुळे महिलांच्या आणि आदिवासी समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या असून मनवर यांनी माफी मागितली आहे. त्यामुळे मराठी अभ्यास मंडळही त्यांच्याशी सहमत असून विद्यापीठाच्या प्रतिमेला गालबोट लागू नये म्हणून ही कविता अभ्यास क्रमातून वगळण्याचा निर्णय मराठी अभ्यास मंडळानं एकमतानं घेतल्याचं मंडळाकडून स्पष्ट करण्यात आलं.

तर पत्रकार पाटील यांनीही याप्रकरणी माफी मागितली आहे. त्यामुळे आता वाद संपुष्टात येण्याची शक्यता आहे.



हेही वाचा-

कवितेत अश्लील मजकूर, महिला आयोगाची कवी दिनकर मनवर यांना नोटीस

कला शाखेच्या अभ्यासक्रमात अश्लील मजकूर



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा