Advertisement

कला शाखेच्या अभ्यासक्रमात अश्लील मजकूर

कला शाखेच्या तृतीय वर्ष अभ्यासक्रमात दिनकर मनवर यांची 'पाणी कसं असतं' ही कविता आहे. या कवितेमध्ये पाण्याचं वर्णन आदिवासी महिलेच्या शरीराशी करण्यात आलं आहे. ही बाब आक्षेपार्ह असून विद्यापीठाने ही कविता नेमकी कोणता विचार करून अभ्यासक्रमात घेतली, याचा खुलासा करावा, अशी मागणी छात्र भारतीचे मुंबई विभागाचे अध्यक्ष सचिन बन्सोडे यांनी केली आहे.

कला शाखेच्या अभ्यासक्रमात अश्लील मजकूर
SHARES

मुंबई विद्यापीठाच्या कला शाखेच्या तृतीय वर्ष अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आलेल्या कवितेमध्ये आदिवासी महिलांबद्दल अश्लिल मजकूर वापरण्यात आल्याचा दावा करत काही विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. याबाबत विद्यार्थ्यांनी तक्रार विद्यापीठ प्रशासनाकडं तक्रार देखील नोंदवली आहे.


कुठली कविता?

कला शाखेच्या तृतीय वर्ष अभ्यासक्रमात दिनकर मनवर यांची 'पाणी कसं असतं' ही कविता आहे. या कवितेमध्ये पाण्याचं वर्णन आदिवासी महिलेच्या शरीराशी करण्यात आलं आहे. ही बाब आक्षेपार्ह असून विद्यापीठाने ही कविता नेमकी कोणता विचार करून अभ्यासक्रमात घेतली, याचा खुलासा करावा, अशी मागणी छात्र भारतीचे मुंबई विभागाचे अध्यक्ष सचिन बन्सोडे यांनी केली आहे. तसंच कविता लिहिताना कवीला स्वातंत्र्य आहे. परंतु अभ्यास मंडळानं कवितेची निवड करताना याचा विचार का केला नाही? असा प्रश्नही बन्सोडे यांनी उपस्थित केला आहे.


वादात युवा सेनेचीही उडी

या संदर्भात त्यांनी दिनकर मनवर यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांची या कवितेतील संबंधित ओळ लिहिण्यामागची भूमिका ते विद्यापीठाला देण्यास तयार असल्याचं त्यांनी सांगितलं. या वादात युवा सेनेनेही उडी घेतली असून, सिनेट सदस्य डॉ. सुप्रिया करंडे, प्रदीप सावंत, वैभव थोरात यांनी प्र-कुलगुरू रवींद्र कुलकर्णी यांना ही कविता अभ्यासक्रमातून वगळण्याबाबत निवेदन दिलं आहे. तसंच या कवितेचा अभ्यासक्रमात समावेश केल्याबद्दल विद्यापीठाने दिलगिरी व्यक्त करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

या प्रकरणी कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांनी सर्वांना निर्देश देऊन तात्काळ अभ्यास मंडळाची बैठक बोलावली असून या विषयावर निर्णय घेण्यास सांगितलं आहे, असं विद्यापीठाचं जनसंपर्क विभागाचे उपकुलसचिव लिलाधर बन्सोड यांनी सांगितलं. याप्रकरणी मनवर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र तो होऊ शकला नाही.हेही वाचा-

रुस्तमजी शाळेचा मनमानी फी दरवाढी विरोधात युवासेनेचं आंदोलन

दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी 'दिव्यांग फ्रेंडली उत्तरपत्रिकासंबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा