Advertisement

दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी 'दिव्यांग फ्रेंडली उत्तरपत्रिका

गेल्या अनेक वर्षापासून मुंबई विद्यापीठ उत्तरपत्रिकांचं संगणकाधारित ऑनलाईन मूल्यांकन करीत आहे. संगणकाधारित मूल्यांकन करीत असताना दिव्यांग विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकांच्या मूल्यांकनात काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या होत्या. या अडचणी दूर करण्यासाठी येत्या हिवाळी सत्राच्या परीक्षेपासून दिव्यांग विद्यार्थ्यांच्या मूळ व पुरवणी उत्तरपत्रिकेच्या ३, १०, व १५ पानावर उजव्या बाजूच्या भागात 'दिव्यांग' असा उल्लेख असणारा शिक्का मारण्यात येणार आहे.

दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी 'दिव्यांग फ्रेंडली उत्तरपत्रिका
SHARES

गेल्या काही वर्षापासून मुंबई विद्यापीठानं संगणकाद्वारे उत्तरपत्रिकेचं ऑनलाईन मूल्यांकन सुरू केलं आहे. परंतु यात दिव्यांग विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका तपासण्यासाठी अनेक अडचणी येत आहेत. या अडचणी टाळण्यासाठी यंदाच्या हिवाळी सत्र परीक्षेपासून दिव्यांग विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकेवर 'दिव्यांग', असा उल्लेख करण्यात येणार आहे.

ऑनलाईन मूल्यांकन

गेल्या अनेक वर्षापासून मुंबई विद्यापीठ उत्तरपत्रिकांचं संगणकाधारित ऑनलाईन मूल्यांकन करीत आहे. संगणकाधारित मूल्यांकन करीत असताना दिव्यांग विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकांच्या मूल्यांकनात काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या होत्या. या अडचणी दूर करण्यासाठी येत्या हिवाळी सत्राच्या परीक्षेपासून दिव्यांग विद्यार्थ्यांच्या मूळ व पुरवणी उत्तरपत्रिकेच्या ३, १०, व १५ पानावर उजव्या बाजूच्या भागात 'दिव्यांग' असा उल्लेख असणारा शिक्का मारण्यात येणार आहे.

असा निर्णय मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा मंडळानं घेतला आहे. नुकतचं विद्यापीठानं याबाबतच परीपत्रक काढण्यात आलं असून सर्व परीक्षा केंद्रांना पाठवण्यात आलं आहे. 'दिव्यांग' उल्लेख असणारा रबरी स्टॅम्प प्रत्येक कॉलेजांनी त्वरित बनवून घ्यावा, अशी सूचनाही या परीपत्रकात करण्यात आली आहे.

अतिरिक्त वेळ मिळणार

'दिव्यांग' विद्यार्थ्यांना परीक्षामध्ये काही सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासंदर्भात महाराष्ट्र शासनानं शासन निर्णय प्रसिद्ध केला होता. या निर्णयानुसार दिव्यांग विद्यार्थ्यांना दर तासाला २० मिनिटे म्हणजेच ३ तासाच्या परीक्षेसाठी ६० मिनिटे अतिरिक्त वेळ देण्यात येत असून त्या विद्यार्थ्याला ५ टक्के गुणाची सवलत देण्यात येते.

गरोदर स्त्रियांनाही सवलत

त्याशिवाय गरोदर स्त्रिया ही परीक्षा देत असतील तर त्यांना जवळचं परीक्षा केंद्रही उपलब्ध करूऩ देण्यात येतं. यानुसारच उत्तरपत्रिका तपासताना विद्यार्थी 'दिव्यांग' आहेत हे निर्देशित होण्यासाठी हा शिक्का उत्तरपत्रिकेवर मारण्यात येणार आहे. जेणेकरून शिक्षक दिव्यांगाची उत्तरपत्रिका तपासताना शासनाने दिलेल्या निर्देशाचा अवलंब करेल व त्यानुसार दिव्यांग विद्यार्थ्यांना नियमानुसार गुण देवू शकेल. दरम्यान या नव्या उत्तरपत्रिकेवरील दिव्यांग शिक्क्याचा फायदा याचा फायदा दिव्यांग विद्यार्थ्यांना होईल.

मुंबई विद्यापीठाने उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन करण्यासाठी संगणकाधारित प्रणालीचा अवलंब केल्यानं दिव्यांग विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकांच्या मूल्यांकनामध्ये काही अडचणी येत होत्या. त्यामुळं 'दिव्यांग' हा शिक्का उत्तरपत्रिकेवर मारल्यानं, शिक्षक शासन निर्णयानुसार शिक्षक दिव्यांगांच्या उत्तरपत्रिका तपासतील व याचा फायदा दिव्यांग विद्यार्थ्यांना निश्चित होईल.
- डॉ. अर्जुन घाटुळे, संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ

हेही वाचा-

शिक्षकांना चॅनेलवरुन देण्यात येणारं प्रशिक्षण मराठीतच - विनोद तावडे

सर्जिकल स्ट्राईक दिन पाळा, यूजीसीचे काॅलेज, विद्यापीठांना आदेश

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा