Advertisement

शिक्षकांना चॅनेलवरुन देण्यात येणारं प्रशिक्षण मराठीतच - विनोद तावडे

गुजरात सरकारकडं स्वत: ची १६ शैक्षणिक चॅनेल आणि वाहिन्या सुरु असून, या माध्यमातून महाराष्ट्रातील शिक्षकांना विनामूल्य प्रशिक्षण देण्याची सुविधा गुजरात सरकारनं दर्शविली आहे. त्यामुळं गुजरात सरकारच्या 'वंदे गुजरात' या शैक्षणिक चॅनेलच्या माध्यमातून शिक्षकांना विनाशुल्क प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

शिक्षकांना चॅनेलवरुन देण्यात येणारं प्रशिक्षण मराठीतच - विनोद तावडे
SHARES

राज्यात २०१८ -१९ या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता पहिली व आठवीचा अभ्यासक्रम बदलण्यात आला आहे. या अभ्यासक्रमांतील बदलाबाबत राज्यातील शिक्षकांना डिजिटल माध्यमातून प्रशिक्षण देण्यासाठी गुजरात सरकारच्या 'वंदे गुजरात' या चॅनलचा वापर करण्यात येणार आहे. गुजरात सरकारकडं स्वत: ची १६ शैक्षणिक चॅनेल आणि वाहिन्या सुरु असून, या माध्यमातून महाराष्ट्रातील शिक्षकांना विनामूल्य प्रशिक्षण देण्याची सुविधा गुजरात सरकारनं दर्शविली आहे. त्यामुळं गुजरात सरकारच्या 'वंदे गुजरात' या शैक्षणिक चॅनेलच्या माध्यमातून शिक्षकांना विनाशुल्क प्रशिक्षण देण्यात येणार आहे.


विरोधकांची टीका

मराठी शिक्षकांना गुजराती वाहिनीवरून प्रशिक्षण देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर विरोधकांनी टीका केली आहे. परंतु विरोधकांचे आरोप खोटे ठरवत, यासंदर्भातील संपूर्ण वस्तुस्थितीची माहिती घ्यावी व त्यानंतर असे बिनबुडाचे आरोप करावेत, असं मत शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी व्यक्त केलं.


सह्याद्रीवर शुल्क आकारणी

सध्या राज्यातील शिक्षकांना पाठ्यपुस्तकांबाबत प्रशिक्षण देण्यासाठी दूरदर्शनच्या सह्याद्री चॅनेलवरील प्रक्षेपणासाठी सरकारला पैसे द्यावे लागतं होते. परंतु गुजरात सरकारने स्वत: च्या १६ चॅनेलच्या माध्यमातून हे प्रक्षेपण विनाशुल्क DD Direct Free DTH यावर उपलब्ध करुन देण्याची तयारी दर्शवली होती. राज्यातील बहुतांश शिक्षकांपर्यंत या माध्यमाद्वारं एकाचवेळी पोहोचता येणार असून या उद्देशानं हे प्रशिक्षण शैक्षणिक वाहिनीद्वारं प्रक्षेपित करून देण्यात आलं आहे.


या प्रशिक्षणासाठी आवश्यक असलेल्या उपकरणांचा खर्चही राज्य सरकारला द्यावा लागणार आहे. तसंच जर गुजरात सरकार अशा प्रकारचं डिजिटल प्रशिक्षण विनाशुल्क उपलब्ध करुन देत असेल तर या प्रशिक्षणावर राज्य सरकारकडून होणाऱ्या खर्चामध्ये नक्कीच बचत होणार आहे. गुजरातचं हे चॅनेल जीओ, डिटीएच, वोडाफोन, एअरटेल या सर्व ॲपवर उपलब्ध होणार आहे. गुजरात सरकारनं दिलेली सेवा ही विनाशुल्क असून, आम्ही शिक्षकांच्या डिजिटलच्या प्रशिक्षणासाठी पाकिस्तानच्या चॅनेलचा वापर केलेला नाही.
- विनोद तावडे, शिक्षण मंत्री



हेही वाचा-

रूस्तमजी शाळेचा मनमानी कारभार, फी दरवाढीचा पालकांना त्रास

'लाॅ' अभ्यासक्रमावर तोडगा निघणार? विशेष बैठकीचं आयोजन



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा