Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
59,44,710
Recovered:
56,85,636
Deaths:
1,16,026
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
14,807
666
Maharashtra
1,39,960
9,830

रूस्तमजी शाळेचा मनमानी कारभार, फी दरवाढीचा पालकांना त्रास

दहिसरच्या रूस्तुमजी इंटरनॅशनल शाळेनं फी दरवाढ केल्याची तक्रार पालकांकडून करण्यात आली होती. याबाबत महापालिकेच्या शिक्षण अधिकाऱ्यांकडून चौकशीचे आदेश देण्यात आले होते. या चौकशी अहवालानुसार शाळेनं ही नियमबाह्य शुल्कवाढ केल्याचं समोर आलं आहे.

रूस्तमजी शाळेचा मनमानी कारभार, फी दरवाढीचा पालकांना त्रास
SHARES

दहिसर येथील 'रूस्तमजी इंटरनॅशनल स्कूल' या इंग्रजी माध्यमाच्या विनाअनुदानित शाळेनं नियमबाह्य शुल्कवाढ केल्याचं समोर आलं आहे. महापालिकेच्या शिक्षण मंडळानं याबाबतच अहवाल तयार केला आहे. रूस्तुमजी इंटरनॅशनल शाळेनं फी दरवाढ केल्याची तक्रार पालकांकडून करण्यात आली होती. याबाबत महापालिकेच्या शिक्षण अधिकाऱ्यांकडून चौकशीचे आदेश देण्यात आले होते. या चौकशी अहवालानुसार शाळेनं ही नियमबाह्य शुल्कवाढ केल्याचं समोर आलं आहे.


किती टक्के फी वाढ?

रूस्तमजी शाळेनं पहिलीच्या शुल्कात पालकांच्या संमतीनं १० टक्के वाढ केली होती. ही वाढ पहिलीपासून लागू होणं अपेक्षित होतं, परंतु शाळेनं ही फी दरवाढ बालवाडीसह इयत्ता दुसरी व पाचवीलाही लागू केली आहे. ही दरवाढ नियमबाह्य असल्याची पालकांची तक्रार होती.

रूस्तमजी शाळेची २०१६-१७ साली असलेली इयत्ता पहिलीची फी ३२ हजार ७६० रुपयांवरून २०१७ -१८ मध्ये ३६ हजार ०५० रुपये करण्यात आली. त्यानंतर यंदाच्या शैक्षणिक वर्षात हीच फी ५० हजार ४०० रुपये करण्यात आली. गेल्या वर्षीची फी १० टक्क्यांनी तर यंदाच्या वर्षातील फी ४० टक्क्यांनी वाढल्यानं पालकांना दरवर्षी हजारो रूपयाची फीदरवाढ सहन करावी लागत आहे.


अधिकाऱ्यांच्या पाहणीत उघड

'रूस्तमजी इंटरनॅशनल' या शाळेनं नियमबाह्य शुल्कवाढ केल्याची तक्रार शिक्षण अधिकारी कार्यालयाकडं केली होती. या तक्रारीवर योग्य ती कारवाई व्हावी यासाठी कार्यकारणी सदस्य व महापालिकेचे शिक्षण समिती सदस्य साईनाथ दुर्गे यांनी शिक्षण अधिकारी कार्यालयाकडं पाठपुरावा केला होता. यानुसार या प्रकरणाची चौकशी महापालिका शिक्षण विभागाच्या शाळा अधिक्षक व विभाग निरीक्षक यांनी प्रत्यक्ष रुस्तमजी शाळेत जाऊन वस्तुस्थितीची पडताळणी केली होती. त्यावेळी शाळेची शुल्कवाढ नियमबाह्य असल्याचं स्पष्ट झालं होतं.


कारवाईच्या नावाने बोंब

त्याची दखल घेऊन हा अहवाल आता विभागीय शुल्क नियामक समितीचे पदसिद्ध सचिव व शिक्षण उपसंचालक यांच्याकडे सादर करण्यात आल्याचं शिक्षणाधिकारी महेश पालकर यांनी दुर्गे यांना सांगितलं. शाळांच्या नियमबाह्य फी वाढीच्या तक्रारी येऊनही शालेय शिक्षण विभाग त्यावर कोणतीही कारवाही करताना दिसत नसल्यानं पालकांनी आमच्याकडे तक्रार केली, असं दुर्गे यांनी सांगितलं.हेही वाचा-

'लाॅ' अभ्यासक्रमावर तोडगा निघणार? विशेष बैठकीचं आयोजन

अभियांत्रिकी संस्थांना चाप? थेट शुल्कवाढ न करण्याचं पत्रRead this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा