Advertisement

'लाॅ' अभ्यासक्रमावर तोडगा निघणार? विशेष बैठकीचं आयोजन

मुंबई विद्यापीठाने 'लॉ' अभ्यासक्रमासाठी ६०/४० ही नवीन परीक्षा पद्धत लागू केली असून, त्याविरोधात विद्यार्थी संघटनांनी बंड पुकारलं आहे. या आंदोलनाची दखल घेत विद्यापीठ प्रशासनानं २४ सप्टेंबर रोजी एक विशेष बैठक आयोजित केली आहे.

'लाॅ' अभ्यासक्रमावर तोडगा निघणार? विशेष बैठकीचं आयोजन
SHARES

मुंबई विद्यापीठाने 'लॉ' अभ्यासक्रमासाठी ६०/४० ही नवीन परीक्षा पद्धत लागू केली असून, त्याविरोधात विद्यार्थी संघटनांनी बंड पुकारलं आहे. मुंबई विद्यापीठाच्या या निर्णयाला विरोध करण्यासाठी 'स्टुडंट लॉ कॉऊन्सिल'नं मंगळवारी याविरोधात आंदोलन केलं होतं. या आंदोलनाची दखल घेत विद्यापीठ प्रशासनानं २४ सप्टेंबर रोजी एक विशेष बैठक आयोजित केली आहे. या बैठकीला विद्यापीठाचे प्रकुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी उपस्थित राहणार असून त्यासोबतचं सर्व विद्यार्थी संघटना सहभागी राहणार आहेत.


नवी परीक्षा पद्धत लागू

केंद्रीय विद्यापीठ अनुदान आयोगानुसार मुंबई विद्यापीठानं श्रेयांक श्रेणी पद्धत सुरू केली आहे. या पद्धतीत गेल्या अनेक वर्षांपासून बऱ्याच वेळा बदल करण्यात आला असून काही दिवसांपूर्वी पुन्हा एकदा या पद्धतीत बदल करण्यात येत असल्याचं परिपत्रक मुंबई विद्यापीठानं जाहीर केलं होतं. या परिपत्रकानुसार आता परीक्षेत ६०/४० ही पद्धत वापरण्यात येणार असून 'लॉ' शाखेमध्ये ही पद्धत सुरू करण्यात आली आहे. या नव्या पद्धतीनुसार 'लॉ' शाखेत आता ६० गुणांच्या परीक्षेत १८ गुण मिळवणं बंधनकारक ठरणार असून ४० गुणांच्या परीक्षेत १२ गुणांची अट ठेवण्यात आली आहे. त्यामुळे 'लॉ' शाखेच्या परीक्षेत उत्तीर्ण होण्याच्या नियमातही बदल झाला आहे.




विद्यार्थी संघटनांचा विरोध

विद्यापीठ प्रशासनानं घेतलेल्या या निर्णयाला अनेकांनी विद्यार्थी संघटनांनी विरोध केला आहे. विशेष म्हणजे विद्यार्थी संघटनांतर्फे याबाबत प्रकुलगुरूंना पत्रही दिल होतं. त्याशिवाय change.org या वेबसाईटवर ही ऑनलाईन याचिका दाखलही केली होती. त्यानंतर अखेरीस नाईलाज म्हणून विद्यार्थी संघटनानी आंदोलनाचा पावित्रा घेतला. या आंदोलनानंतर विद्यापीठानं विद्यार्थ्यांच्या ४० गुणांचे प्रोजेक्ट सादर करण्याची मुदत पुढील आदेश मिळेपर्यंत वाढवण्यात आल्याचं परिपत्रक काढलं आहे.


विद्यापीठाने काढलेल्या परिपत्र सर्व कॉलेजच्या प्राचार्यांनी विद्यार्थ्यांच्या निदर्शनास लवकरात लवकर द्यावं. परंतु त्यातही अनेक कॉलेज विद्यार्थ्यांना जबरदस्ती प्रोजेक्ट आणि परीक्षा देण्यात दबाव टाकत आहेत. मुंबई विद्यापीठाच्या परीपत्रकानुसार प्रोजेक्ट व परीक्षा पुढील आदेशापर्यंत वाढवण्यात आलं आहे. त्यानुसार कोणत्याही कॉलेजांकडून विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यास दबाव टाकू नये, तसंच सर्व कॉलेज प्राचार्यांनी हे परिपत्रक नोटीस बोर्डवर लावावं.
- सचिन पवार, अध्यक्ष, स्टुडंट लॉ काऊन्सिल



हेही वाचा-

'लॉ'च्या विद्यार्थ्यांचे उद्यापासून आंदोलन

'आयडॉल'चा टीवायबीकॉमचा निकाल जाहीर



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा