Advertisement

प्रहार विद्यार्थी संघटना आणि मुप्टा शिक्षक संघटनेचं आंदोलन


प्रहार विद्यार्थी संघटना आणि मुप्टा शिक्षक संघटनेचं आंदोलन
SHARES

फोर्ट - मुंबई विद्यापीठाच्या निष्क्रिय प्रशासकीय कारभाराविरोधात प्रहार विदयार्थी संघटना आणि मुप्टा शिक्षक संघटनेने फोर्ट येथील मुंबई विदयापीठ परिसरात बुधवारपासून धरणे आंदोलनाला सुरुवात केलीय.

1) मुंबई विदयापीठाच्या सहाय्यक कुलसचिव योगिनी घारे यांची नियुक्ती नियमबाह्य असल्यामुळे त्यांच्यावर तात्काळ करवाई करण्यात यावी

2) संचालक विद्यापीठाला वेळोवेळी पाठवलेल्या पत्रान्वये अर्हताधारक प्राचार्य डॉ. स्नेहल दोंदे यांना ताबडतोबड मान्यतापत्र देण्यात यावे

3) लिअझन (Laison)ऑफिसरची विद्यापीठात तातडीने नियुक्ती करण्यात यावी 

4) अर्हताधारक नसलेल्या प्राचार्यावर विद्यापीठाकडून देण्यात आलेली मान्यता रद्द करण्याची तातडीची कार्यवाही करण्यात यावी 

5) विद्यापीठांतर्गत येत असलेल्या महाविदयालयामध्ये CAS चा प्रस्ताव मान्य करण्याकरीता अधिकारी वर्गाकडून आणि समिती सदस्याकडून होत असलेला हेतुपुरस्सर अन्याय आणि नाहक त्रास तातडीने थांबवण्यात यावा 

आदी मागण्या प्रहार संघटना आणि मुप्टा शिक्षक संघटनेने केल्या आहेत. या वेळी प्रहार विदयार्थी संघटनेचे अध्यक्ष अॅड. मनोज टेकाडे, सरचिटणीस अजय तापकीर, सचिव आदित्य श्रावस्ती, प्रवक्ता महेश दाभोळकर, प्रसिद्धीप्रमुख राघवेंद्र कांबळे, महेश अघाव, मुकेश वसावे, अक्षय काळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा