Advertisement

पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या भ्रष्टाचारी कारभारविरोधात विद्यापीठावर मोर्चा

गेल्या कित्येक वर्षांपासून पीपल्स एज्युकेशन सोसायटी या शिक्षण संस्थेकडं मुंबई विद्यापीठ दुर्लक्ष करत आहे. काही प्राध्यापकांना मान्यता देऊनही केवळ शिक्षणमंत्र्यांच्या दबावाखाली विद्यापीठ प्रशासन त्यांना कामावर रूजू करण्यास मनाई करत आहे. याशिवाय या अंतर्गत येणाऱ्या कॉलेजची फी भरमसाठ असून ती भरल्यानंतरही कित्येक वर्ष स्कॉलरशीप ही रखडवून ठेवण्यात आली आहे.

पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या भ्रष्टाचारी कारभारविरोधात विद्यापीठावर मोर्चा
SHARES

मुंबई विद्यापीठातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेली पीपल्स एज्युकेशन सोसायटीमध्ये गेली अनेक वर्ष भ्रष्टाचारी कारभार सुरू आहे. या कारभाराविरोधात जाब विचारण्यासाठी रिपब्लिकन विद्यार्थी सेनेच्यावतीने बुधवारी विद्यापीठाच्या फोर्ट कॅम्पसजवळ धडक दिली.

स्कॉलरशीप रखडवली

गेल्या कित्येक वर्षांपासून पीपल्स एज्युकेशन सोसायटी या शिक्षण संस्थेकडं मुंबई विद्यापीठ दुर्लक्ष करत आहे. काही प्राध्यापकांना मान्यता देऊनही केवळ शिक्षणमंत्र्यांच्या दबावाखाली विद्यापीठ प्रशासन त्यांना कामावर रूजू करण्यास मनाई करत आहे. याशिवाय या अंतर्गत येणाऱ्या कॉलेजची फी भरमसाठ असून ती भरल्यानंतरही कित्येक वर्ष स्कॉलरशीप ही रखडवून ठेवण्यात आली आहे.

 त्याशिवाय गेल्या कित्येक वर्षापासून स्कॉलरशीपचं वाटप न केल्यानं त्यातून आलेला पैसा स्वत:कडे अनधिकृत पद्धतीनं ठेवल्याचा धक्कादायक आरोपही रिपब्लिकन विद्यार्थी सेनेनं केला आहे. या सर्व भ्रष्टाचारी कारभारात विद्यापीठाचे कुलगुरू सुहास पेडणेकर, रजिस्टार दिनेश कांबळे यांसह इतरही विद्यापीठाचेही अधिकारी सहभागी असून तात्काळ याबाबत कारवाई करावी अशी मागणीही करण्यात आली.

कडेकोट बंदोबस्त

यासंदर्भात गेली तीन ते चार वर्ष विद्यापीठाला पत्रव्यवहार व निवदेन दिलं होतं. मात्र याबाबत मुंबई विद्यापीठानं वारंवार दुर्लक्ष केल्यानं अखेर रिपब्लिकन विद्यार्थी सेनेच्या वतीने बुधवारी विद्यापीठाच्या फोर्ट कॅम्पसजवळ मोर्चा काढला. या मोर्च्यात अनेक विद्यार्थी सहभागी झाले असून विद्यापीठ प्रशासनानं कडेकोट बंदोबस्तही ठेवला होता.

पीपल्स एज्युकेशन सोसायटीत गेली अनेक वर्ष भ्रष्टाचारी कारभार सुरू आहे. परंतु या भ्रष्टाचारी कारभाराला आळा बसत नसल्यानं अखेर आम्ही विद्यापीठावर मोर्चा काढला. या मोर्चाची तात्काळ दखल घेत येत्या ३१ ऑक्टोबरपर्यंत विशेष बैठकीचं आयोजन करत याबाबतचा निर्णय घेण्यात येईल असं आश्वासन विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांनी दिलं.
- आशिष गाडे, अध्यक्ष, रिपब्लिकन विद्यार्थी सेनाहेही वाचा -

रद्दी द्या, नव्या कोऱ्या वह्या घ्या!

मुंबई विद्यापीठाने केलं ३५ हजार विद्यार्थ्यांना नापास! आरटीआयमधून खुलासा
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा