Advertisement

रद्दी द्या, नव्या कोऱ्या वह्या घ्या!

रद्दीच्या मोबदल्यास नव्या कोऱ्यावह्या ही योजना राज्यातील जिल्हा परिषद, नगरपालिका, महापालिका, सरकारी अनुदानित शाळा, निमसरकारी यांसह सर्व शाळा व विविध शिक्षण संस्थांमध्ये राबवली जाणार आहे.

रद्दी द्या, नव्या कोऱ्या वह्या घ्या!
SHARES

राज्य सरकारने एका संस्थेशी केलेल्या करारानुसार, आता शालेय विद्यार्थ्यांना आवश्यक असलेल्या नव्याकोऱ्या वह्या रद्दीच्या मोबदल्यात मिळणार आहेत. शालेय शिक्षण विभाग आणि 'नमोआनंद अपसायकलर्स' यांच्यात हा सामंजस्य करार झाला.

रद्दीच्या मोबदल्यास नव्या कोऱ्यावह्या ही योजना राज्यातील जिल्हा परिषद, नगरपालिका, महापालिका, सरकारी अनुदानित शाळा, निमसरकारी यांसह सर्व शाळा व विविध शिक्षण संस्थांमध्ये राबवली जाणार आहे. सध्या आपल्याकडं शालेय वह्या-पुस्तकांची रद्दी जमा करण्याची संघटीत यंत्रणा अस्तित्वात नसली, तरी अशी रद्दी या माध्यमातून एकत्र होऊन तिचा सदुपयोग विद्यार्थ्यांसाठीच होणार आहे.


करारावर स्वाक्षरी

राज्याचा शालेय शिक्षण विभाग व 'नमोआनंद अपसायकलर्स' या स्टार्टअप कंपनीसोबत राज्य सरकारचा सामंजस्य करार असून शालेय शिक्षण विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. वंदना कृष्णा आणि नमोआनंद कंपनीचे संचालक यांनी या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत.


'ग्रीन नोटबुक' मिळणार

राज्यभरातील सर्व शाळांमधील विद्यार्थी आपल्याकडील रद्दी या कंपनीकडे घेऊन आल्यास या विद्यार्थ्यांना या रद्दीच्या मोबदल्यात नव्या कोऱ्या 'ग्रीन नोटबुक' व अन्य कागदी स्टेशनरी मिळणार आहे. दीड वर्षांपूर्वी ही योजना पुण्यातील महापालिका शाळांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात आली होती. त्या योजनेला चांगला प्रतिसाद मिळाला होता.


'इथं' संकलन केंद्रे

'नमोआनंद' कंपनीच्या वतीनं संपूर्ण महाराष्ट्रात जिल्हा, तालुका पातळीवरील शाळांमध्ये रद्दी जमा करण्यासाठी अधिकृत 'आनंद कलेक्शन सेंटर'ची उभारणी करण्यात येणार असून त्या ठिकाणी विद्यार्थ्यांनी स्वेच्छेन रद्दी जमा करायची आहे. विद्यार्थ्यांकडून जमा होणारी रद्दी शाळेतील कलेक्शन सेंटरमध्ये जमा केले जाणार आहे.


वह्यांची पुनर्निर्मिती

त्यानंतर या कलेक्शन सेंटरमध्ये रद्दी कागदांपासून पुनर्निर्मिती करून वह्या निर्माण करण्यात येणार आहे. या रद्दीमध्ये वह्या, पुस्तके, प्रश्नपत्रिका किंवा अन्य वापरलेली किंवा न वापरलेली पुस्तके आणि कागद किंवा अन्य रद्दीचा समावेश असणार आहे. विशेष म्हणजे या सर्व वह्या १०० टक्के पर्यावरणस्नेही असणार आहे.



हेही वाचा-

मुंबई विद्यापीठाने केलं ३५ हजार विद्यार्थ्यांना नापास! आरटीआयमधून खुलासा

समाजशास्त्र विभागाच्या शताब्दी वर्ष महोत्सवाला सुरुवात



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा