Advertisement

मुंबई विद्यापीठाने केलं ३५ हजार विद्यार्थ्यांना नापास! आरटीआयमधून खुलासा

पुनर्मूल्यांकनासाठी एकूण ९७ हजार ३१३ विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. त्यापैकी ३५ हजार विद्यार्थी पुनर्मूल्यांकनात उत्तीर्ण झाले आहेत. याचाच अर्थ असा होतो की मुंबई विद्यापीठाने ३७ टक्के विद्यार्थ्यांना नापास केलं होतं.

मुंबई विद्यापीठाने केलं ३५ हजार विद्यार्थ्यांना नापास! आरटीआयमधून खुलासा
SHARES

मुंबई विद्यापीठाने गेल्या वर्षी थोड्याथोडक्या नव्हे, तर विविध शाखांतील तब्बल ३५ हजार विद्यार्थ्यांना चुकून नापास केल्याचा धक्कादायक खुलासा समोर आला आहे. माहिती अधिकार कायद्यांतर्गत मागवलेल्या माहितीतून ही बाब पुढे आली आहे. या विद्यार्थ्यांनी १.८१ लाख उत्तरपत्रिकांच्या पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज केला होता. पुनर्मूल्यांकनानंतर हे विद्यार्थी उत्तीर्ण झाले.


३७ हटक्के विद्यार्थी

पुनर्मूल्यांकनासाठी एकूण ९७ हजार ३१३ विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. त्यापैकी ३५ हजार विद्यार्थी पुनर्मूल्यांकनात उत्तीर्ण झाले आहेत. याचाच अर्थ असा होतो की मुंबई विद्यापीठाने ३७ टक्के विद्यार्थ्यांना नापास केलं होतं.


मूल्यांकनावर प्रश्नचिन्ह

माहिती अधिकारांतर्गत मिळालेल्या माहितीनुसार, २०१४ ते २०१६ दरम्यान अंदाजे ७३ हजार विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका चुकीच्या पद्धतीने तपासण्यात आल्या होत्या. यावरून मुंबई विद्यापीठाच्या मूल्यांकनाच्या पद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे.

उन्हाळी सत्रात देखील ४९,५९६ विद्यार्थ्यांना आपल्या उत्तरपत्रिका योग्य रितीने तपासण्यात न आल्याची शंका होती. त्यानुसार त्यांनी पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज केले. यापैकी १६,७३९ विद्यार्थी पुनर्मूल्यांकनात उत्तीर्ण झाले.


विश्वाहर्तता धोक्यात

ही माहिती बाहेर काढणारे आरटीआय कार्यकर्ता विहार दुर्वे यांनी सांगितलं की, मुंबई विद्यापीठाची विश्वाहर्तता दिवसेंदिवस ढासळत चालली आहे. त्यामुळे या विद्यापीठातून परीक्षा द्यायची की नाही याचाही काही विद्यार्थी गांभीर्याने विचार करू लागले आहेत. काही विद्यार्थ्यांना पुनर्मूल्यांकनाचे निकाल देखील वेळेवर न मिळाल्याने त्यांच्या करिअरवर परिणाम झाला आहे. अनेकांना नाईलाजाने सप्लिमेंटरी परीक्षा द्यावी लागली आहे.



हेही वाचा-

मुंबई विद्यापीठाचे रखडलेले १८ निकाल लवकरच!

विद्यार्थ्यांसाठी मुंबई विद्यापीठाचं अॅप



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा