Advertisement

भारतात मुंबई आयआयटी अव्वल स्थानी

'क्यूएस वर्ल्ड रँकिंग' या जागतिक मानांकन संस्थेच्या रोजगारक्षम पदवी देणाऱ्या शैक्षणिक संस्था-२०२० च्या क्रमवारीत आयआयटी मुंबई देशात अव्वल स्थानी आहे.

भारतात मुंबई आयआयटी अव्वल स्थानी
SHARES

'क्यूएस वर्ल्ड रँकिंग' या जागतिक मानांकन संस्थेच्या रोजगारक्षम पदवी देणाऱ्या शैक्षणिक संस्था-२०२० च्या क्रमवारीत आयआयटी मुंबईनं स्थान मिळवलं आहे. क्यूएस रॅंकिंग- २०२० च्या या जागतिक क्रमवारीत आयआयटी बॉम्बे १११ ते १२० च्या क्रमवारीत असलं तरी भारतात अव्वल स्थान पटकावलं आहे. या क्रमवारीत पहिले ३ क्रमांक हे अमेरिकेतील शैक्षणिक संस्थांनी पटकावले आहेत. मॅसॅच्युसेट्स विद्यापीठ, स्टॅण्डफोर्ड विद्यापीठ, कॅलिफोर्निया विद्यापीठ ही विद्यापीठे अनुक्रमे पहिल्या, दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकावर आहेत.

सर्वाधिक रोजगार प्राप्त

क्यूएस वर्ल्ड रँकिंगकडून कोणत्या शैक्षणिक संस्थेकडून विद्यार्थ्यांना सर्वाधिक रोजगार प्राप्त करून दिला जातो याबाबत जागतिक क्रमवारी जाहीर केली. गुरूवारी ही क्रमवारी जाहीर करण्यात आली आहे. या वर्षी क्यूएस संस्थेनं रोजगारक्षम पदवी देणारी शैक्षणिक संस्था या विभागासाठी जगातील ७५८ शैक्षणिक संस्थांचे सर्वेक्षण केलं.

शैक्षणिक संस्था

आयआयटी मुंबईला क्रमवारीच्या १११-१२० या पट्ट्यात स्थान मिळालं आहे. तसंच, आयआयटी मुंबईचा रँकिंग स्कोर १०० पैकी ५४-५५.१ इतका आहे. क्यूएस रँकिंगमध्ये आयआयटी मुंबई ही संस्था पहिल्या शंभरीत नसली तरी भारतातील रोजगारक्षम पदवीसाठीची पहिल्या क्रमांकाची शैक्षणिक संस्था ठरली आहे. मुंबई विद्यापीठातील भारतातील सातव्या क्रमांकाची संस्था होण्याचा मान मिळाला असून जागतिक क्रमवारीत २५१ ते ३०० च्या क्रमवारीत आहे.

शिक्षणसंस्थांचं स्थान

  • आयआयटी मुंबई : १११ ते १२०
  • आयआयटी दिल्ली : १५१ ते १६०
  • आयआयटी मद्रास : १७१ ते १८०
  • दिल्ली विद्यापीठ : १९१ ते २००
  • आयआयटी खरगपूर : २०१ ते २५०
  • बिट्स पिलानी, मुंबई विद्यापीठ : २५१ ते ३००
  • आयआयएससी, आयआयटी कानपूर, कोलकाता विद्यापीठ : ३०१ ते ५००



हेही वाचा -

मुंबईसह उपनगरात जोरदार पावसाची हजेरी

९ ऑक्टोबरपासून बेस्ट कामगार बेमुदत संपावर



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा