Advertisement

आयआयटी मुंबई जगात १७२ व्या क्रमांकावर


आयआयटी मुंबई जगात १७२ व्या क्रमांकावर
SHARES

जगभरातील शैक्षणिक संस्थांची गुणवत्ता क्यूएस वर्ल्ड रँकिंग २०२१ मध्ये जाहीर झाली आहे. या यादीत जगातील पहिल्या ५०० संस्थांमध्ये भारतातील ८ संस्थांना स्थान मिळालं आहे. शैक्षणिक, संशोधन, पायाभूत सुविधा आदींच्या आधारे ही गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली आहे. मात्र, यामध्ये भारताची सर्वाधिक प्रसिद्ध आयआयटी मुंबई जागतिक क्रमवारीत घसरली आहे.

भारतातील प्रसिद्ध आयआयटी मुंबई जागतिक क्रमवारीत घसरली आहे. मात्र देशात ही संस्था अव्वल आली आहे. २०२० च्या तुलनेत क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग २०२१ मध्ये आयआयटी मुंबईचं स्थान २० अंकांनी खाली घसरलं आहे. २०२१च्या यादीत आयआयटी जागतिक स्तरावर १७२ व्या क्रमांकावर आली आहे. २०२०मध्ये १५२व्या स्थानावर होती. 

देशाच्या यादीत आयआयटी मुंबई अव्वल आली आहे. आयआयटी मुंबईला १०० पैकी ४६ गुण मिळाले आहेत. शैक्षणिक विभागात संस्थेला ५०.४, तर प्राध्यापकांचा शैक्षणिक दर्जा या विभागात ७४.२ गुण मिळाले आहेत. भारतीय विज्ञान संस्थान, बेंगळुरूनं यंदाच्या क्यूएस वर्ल्ड रँकिंगमध्ये १८५ वं स्थान पटकावलं आहे. तसंच या यादीत आयआयटी दिल्ली १९३ व्या स्थानावर पोहोचली आहे.

भारतीय संस्था आणि त्यांचे रँकिंग

  • आयआयटी मद्रास - २७५
  • आयआयटी खडगपूर - ३१४
  • आयआयटी कानपूर - ३५०
  • आयआयटी रुरकी - ३८३
  • आयआयटी गुवाहाटी - ४७०



हेही वाचा -

मुंबईत जोरदार वाऱ्यासह पावसाची हजेरी

प्रमुख गणेशोत्सव मंडळांनी घेतली पोलिस आयुक्तांची भेट, ‘या’ निर्णयावर सर्वांचे एकमत



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा