Advertisement

मुंबईत जोरदार वाऱ्यासह पावसाची हजेरी

निसर्ग चक्रीवादळानंतर विश्रांती घेतलेल्या पावसानं गुरूवारी दमदार हजेरी लावली आहे.

मुंबईत जोरदार वाऱ्यासह पावसाची हजेरी
SHARES

मुंबईत जोरदार वाऱ्यासह पावसानं हजेरी लावली आहे. मुंबईतील दादर, माटुंगा, लालबाग, परळ, अंधेरी, मालाड, कुर्ला या परिसरात जोरदार पावसानं हजेरी लावली आहे. निसर्ग चक्रीवादळानंतर विश्रांती घेतलेल्या पावसानं गुरूवारी दमदार हजेरी लावली आहे. मुंबईत पहाटेपासूनच ढगाळ वातावरण होतं. या पावसामुळं मुंबईतीलसखल भागांत पाणी साचण्याची शक्यता आहे.

दरवर्षी मुंबईत जास्तीता पाऊस पडल्यावर अनेक सखल भागात गुडघाभर पाणी साचतं. यावेळी पाणी साचल्यानं नागरिकांना रस्त्यावरून चालण्यासाठी मार्ग काढताना मोठ्या अडचणींचा सामना करावाल लागतो. त्याशिवाय कामाला जाणाऱ्या चाकरमान्यांचेही हाल झाले आहेत. मुंबईसह नवीमुंबई, पनवेल भागात पाऊस पडत आहे.

मुंबईत पाणी साचण्याची ठिकाणं लक्षात घेत महापालिकेनं दक्षता घेतली आहे. पावसाळ्यापूर्वीची काम अद्याप अनेक ठिकाणी पूर्ण झालेली नाही त्यामुळं पाणी साचण्याची शक्यता आहे. मुंबईत दरवर्षी जुन महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात मान्सून दाखल होतो. परंतु, यंदा हवामान विभागानं पहिल्या पंधरवड्यात मुंबईत मान्सून दाखल होणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. तसंच, मान्सून दाखल होण्यापूर्वी मुंबईत मान्सूनपूर्व पाऊस पडत आहे.



हेही वाचा -

कोरोनाचा कहर ! राज्यात दिवसभरात १४९ मृत्यूंची नोंद, तर ३२५४ नवे रुग्ण

तर पुन्हा लाॅकडाऊन करावं लागेल, उद्धव ठाकरेंचा इशारा



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा