Advertisement

पुर्नमूल्यांकनाच्या कामाशी निगडीत असणाऱ्या शिक्षकांवर कारवाई - रविंद्र वायकर


पुर्नमूल्यांकनाच्या कामाशी निगडीत असणाऱ्या शिक्षकांवर कारवाई - रविंद्र वायकर
SHARES

विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका तपासणी करणारे तसंच पुर्नमूल्यांकनाच्या कामाशी निगडीत शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा वारंवार होणाऱ्या चुकांचा फटका विद्यार्थ्यांना बसत आहे. या व्यक्तीवर दंडात्मक कारवाई करून पुर्नमूल्यांकनासाठी विद्यार्थ्यांकडून आकारण्यात आलेलं शुल्क त्यांना परत करण्यात यावं असे आदेश उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री रविंद्र वायकर यांनी विद्यापीठ प्रशासनाला दिले आहेत.
मुंबई विद्यापीठातील विविध समस्यांबाबत वायकर यांनी बुधवारी विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसमध्ये बैठक बोलवली होती. या बैठकीला मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. सुहास पेडणेकर, प्र-कुलगुरू कुलकर्णीसंह सिनेट सदस्यही उपस्थित होते.


विद्यापीठ प्रशासनाला निर्देश

गेल्या काही वर्षांमध्ये पुर्नमूल्यांकनासाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये वाढ झाली असून यापैकी अनेक विद्यार्थ्यांच्या पुर्नमूल्यांकन केल्यानंतर गुणात वाढ झाल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे उत्तरपत्रिका तपासणाऱ्या शिक्षकांवर दंडात्मक कारवाई करून विद्यार्थ्यांनी भरलेली रक्कम तात्काळ त्यांना परत करावी आणि ही रक्कम दोषी व्यक्तींकडून वसुल करावी.

त्याशिवाय पेपर सेट करताना त्यात चुका आढळल्यास विद्यापीठ कायद्यानुसार त्याच्यावर कारवाई करावी. त्याशिवाय परीक्षांच्या काळात परीक्षा विभाग दिवस रात्र सुरू ठेवून प्रत्येक विषयातील प्राध्यापकांची तसंच अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात यावी, असे निर्देशही रविंद्र वायकर यांनी विद्यापीठ प्रशासनाला दिले आहेत.


वेळापत्रक बदलाला मान्यता 

मुंबई विद्यापीठाशी संलग्नित ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना परीक्षा संपल्यानंतर एसटी बस मिळत नसल्यानं त्यांची गैरसोय होते. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी परीक्षेच्या वेळापत्रकात बदल करावा, अशी मागणी वायकरांनी केली असून त्याला ताबडतोब परीक्षा विभागाचे परीक्षा नियत्रंक अर्जुन घाटुळे यांनी मान्यता दिली आहे.

त्याशिवाय नव्यानं छापण्यात आलेल्या उत्तरपत्रिकेत विद्यार्थ्यांच्या नावाचा रकाना तात्काळ काढून टाकावा यामुळं विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका तपासताना होणारे गैरप्रकार टाळता येतील. तसंच विद्यापीठाच्या परिसरात लवकरात लवकर सीसीटिव्ही कॅमेरेही बसवण्यात यावे असे आदेशही रविंद्र वायकरांनी दिले आहेत.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा