Advertisement

मुंबई विद्यापीठाच्या परीक्षांचे निकाल जाहीर

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खोळंबलेल्या परीक्षांचे निकाल आता लागण्यास सुरुवात झाली आहे. शुक्रवारी मुंबई विद्यापीठाच्या २० परीक्षांचे निकाल जाहीर करण्यात आले.

मुंबई विद्यापीठाच्या परीक्षांचे निकाल जाहीर
SHARES

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खोळंबलेल्या परीक्षांचे निकाल आता लागण्यास सुरुवात झाली आहे. शुक्रवारी मुंबई विद्यापीठाच्या २० परीक्षांचे निकाल जाहीर करण्यात आले. हे निकाल विद्यापीठाच्या http://www.mumresults.in/ या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहेत.


कोरोनामुळे परीक्षा लांबल्या होत्या. त्यामुळे निकाल, शैक्षणिक वर्ष यांबाबत संभ्रम निर्माण झाला होता. त्यानंतर परीक्षांचे नियोजन विद्यापीठाने महाविद्यालयांकडे सोपवले. फेरपरीक्षा (बॅकलॉग) २५ सप्टेंबरपासून, तर नियमित परीक्षा १ ऑक्टोबरपासून सुरू झाल्या. परीक्षांनंतर १५ दिवसांत निकाल जाहीर होऊ लागले आहेत.  उर्वरित परीक्षांचे निकालही लवकरात लवकर जाहीर करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत, असे परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. विनोद पाटील यांनी सांगितले.


हे निकाल जाहीर

बीकॉम सत्र ५ (सीबीसीएस), बीकॉम अकाऊन्ट अँड फायनान्स सत्र ६ आणि सत्र ५, बीकॉम बँकिंग अँड इन्श्युरन्स सत्र ६ आणि सत्र ५, बीफार्म सत्र ७ आणि सत्र ८, टीवाय बीए कलिनरी आर्ट सत्र ५ आणि सत्र ६ (सीबीसीएस), बी-व्होक टुरिझम अँड हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट सत्र ५, बी-व्होक रिटेल मॅनेजमेंट सत्र ५, टीवाय बी कॉम इन्व्हेस्टमेंट मॅनेजमेंट सत्र ५, टीवाय बी कॉम ट्रांसपोर्ट मॅनेजमेंट सत्र ५, टीवाय बी कॉम फायनान्शिअल मॅनेजमेंट सत्र ५, बीएस्सी एव्हिएशन सत्र ५, टीवाय बीकॉम/ बीएमएस एन्व्हायर्न्मेंटल मॅनेजमेंट अँड इकॉनॉमिक्स सत्र ५ बॅचलर ऑफ सोशल वर्क सत्र ५, तृतीय वर्ष बॅचलर ऑफ आर्किटेक्चर सत्र १ आणि सत्र २.


हेही वाचा -

बीकेसी कोविड सेंटरमध्ये अवघ्या १६ सेकंदात फुप्फुस तपासणी

मुंबईत कोरोनाच्या १४ लाख चाचण्यांचा टप्पा पार



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा