कॉलेजात डिग्रीसह लर्निंग लायसन्सही

दादर - राज्यातील सर्व महाविद्यालयीन विद्यार्थांसाठी त्यांच्या महाविद्यालयात दुचाकी तसंच चारचाकी वाहनांचं लर्निंग लायसन्स वितरित करण्यात येण्याचं परिवाहन मंत्री दिवाकर रावते यांनी सांगितल्यानंतर 16 जानेवारीपासून या उपक्रमाची सुरुवात दादरच्या किर्ती महाविद्यालयातून झाली. महाविद्यालयातील विद्यार्थांचा शासकीय यंत्रणेशी थेट संबंध वाहन परवान्याच्या निमित्ताने येतो. शासकीय यंत्रणेत दलालांच्या संबंधात आल्याने विद्यार्थांना संपूर्ण शासकीय यंत्रणाच भ्रष्टाचारी असल्याचं वाटू लागतं. महाविद्यालयातील विद्यार्थांचा हा गैरसमज दूर करण्यासाठी वाहन परवाना थेट विद्यार्थांच्या महाविद्यालयामध्ये प्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांमार्फत योग्य त्या कागदपत्रांची तपासणी करून देण्यात येत आहेत. या उपक्रमामुळे विद्यार्थांचा शैक्षणिक वेळ, प्रवास खर्च आणि परिवहन कार्यालयात सततच्या फेऱ्या मारण्याचा वेळ देखील वाचत असल्याचं महाविद्यालयीन विद्यार्थांनी सांगितलं.

Loading Comments