रायन स्कूलचा 'ग्रॅज्युशन डे' साजरा

 Chembur
रायन स्कूलचा 'ग्रॅज्युशन डे' साजरा

चेंबूर - दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील चेंबूरमधील रायन स्कूलचा 'ग्रॅज्यूशन डे' शनिवारी उत्साहात पार पडला. चेंबूरमधील फाईन आर्टस् सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. यावेळी सिनियर केजीमधून पहिली इयत्तेत दाखल झालेल्या चिमुरड्यांना 'ग्रॅज्यूशन'ची पहिली डिग्री देण्यात आली. मुलांचा उत्साह वाढावा म्हणून अशा प्रकारे वेगळे कार्यक्रम नेहमीच घेत असल्याची प्रतिक्रिया यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका फिलोनिमा डिसोझा यांनी दिली. तसेच यावेळी चिमुरड्यांनी विविध गाण्यांवर नृत्य केले. याशिवाय विविध गाणी देखील या मुलांनी गायली. कार्यक्रमात सहभागी झालेल्या सर्व मुलांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली.

Loading Comments