अंगणवाडी सेविकांचे मानधन आता 6 हजार 500 रुपये


  • अंगणवाडी सेविकांचे मानधन आता 6 हजार 500 रुपये
SHARE

अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपाच्या पार्श्वभूमीवर अंगणवाडी सेविकांचे मानधन 5 हजारावरून 6 हजार 500 तर मदतनीसांचे मानधन अडीच हजार रुपयांवरून 3 हजार 500 रूपये, मिनी अंगणवाडी सेविकांचे मानधन 3 हजार 250 रुपयांवरून 4 हजार 500 रूपये करण्यात आल्याची माहिती महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी तात्काळ पोषण आहार वाटपाचे काम सुरू करावे, असे आवाहनही त्यांनी केले.





या आधी 2014 -15 मध्ये अंगणवाडी सेविकांचे मानधन 5 हजार रूपयांपर्यंत वाढविण्यात आले होते. त्यावेळी शासनाने 289 कोटीं रुपयांची ही मानधनवाढ केली होती. त्यानंतर पुन्हा अंगणवाडी सेविकांना न्याय मिळावा, म्हणून सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली. समितीच्या अहवालानुसार पुन्हा मानधनवाढीचा प्रस्ताव वित्त विभागाकडे पाठविण्यात आला आहे.

पंकजा मुंडे, महिला व बाल विकास मंत्री

शासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत बऱ्याच अंगणवाडी सेविका कामावर परतल्या असून, राज्यातील 25 टक्के अंगणवाड्यांमध्ये पोषण आहार वाटपाचे काम सुरूही झाले आहे. या योजेनचा मुख्य उद्देश 0 ते 6 वयोगटातील बालकांना तसेच गरोदर महिला, स्तनदा माता, किशोरवयीन मुलींना पोषण आहार मिळावा हे आहे.


भाऊबीज दुपटीने वाढविली

शासनामार्फत अंगणवाडी कर्मचाऱ्यांना दरवर्षी 1 हजार रुपयांची भाऊबीज दिली जाते. या रकमेत दुपटीने वाढ करून 2 हजार रूपये देण्यात येणार आहेत. मानधनवाढीपोटी 311.33 कोटी रुपये, तर भाऊबीजेपोटी 52 कोटी रुपयांचा अतिरिक्त भार शासनावर पडणार आहे. महाराष्ट्रातील दोन लाख अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचे मासिक मानधन थेट लाभ हस्तांतरण (DBT) अंतर्गत सार्वजनिक आर्थिक व्यवस्थापन प्रणालीद्वारे (Public Financial Management System) थेट त्यांच्या बँक खात्यात जमा होते, त्यामुळे मानधनाला होणारा विलंब टळला आहे, अशी माहितीही पंकजा मुंडे यांनी यावेळी दिली.



हेही वाचा

अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे आंदोलन


डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)


संबंधित विषय
ताज्या बातम्या