Advertisement

साठ्ये कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी केलं वृक्षारोपण


साठ्ये कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी केलं वृक्षारोपण
SHARES

पावसाळा सुरू झाला की वेध लागतात वृक्षारोपणाचे....मग विविध स्वंयसेवी संस्था, कॉलेज, शाळा वृक्षारोपण करण्यासाठी पुढे येतात. नुकतंच जाणीव चॅरिटेबल ट्रस्टनं जाणीव वसुंधरेची या प्रकल्पाचं आयोजन केलं होतं. त्यात साठ्ये कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेत वृक्षारोपण केलं.


१२५ विद्यार्थ्यांकडून श्रमदान

वसई येथील दत्तक भागात वृक्षारोपण करण्यात आलं असून साठ्ये कॉलेजच्या १२५ विद्यार्थ्यांनी श्रमदान केलं. विशेष म्हणजे फक्त मुलंच नाही तर मुलींनीही यात मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता. वसईतील दत्तक भागात जवळपास ३७० वृक्षांची लागवड केली. वसुंधरेची जाणीव, वाढतं प्रदूषण आणि जागतिक तापमानवाढ (ग्लोबल वार्मिंग)वर मात करण्यासाठी विद्यार्थ्यांनी वृक्षांची लागवड केली.


यांच्या हस्ते वृक्षारोपण

या वृक्षारोपण कार्यक्रमात साठ्ये कॉलेजचे एनसीसी आणि एनएसएस युनिटचे विद्यार्थी, आजी माजी विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. साठ्ये कॉलेजव्यतिरिक्त वर्तक कॉलेज, सेंट पीटर्स कॉलेज, न्यू इंग्लिश स्कूल ज्युनिअर कॉलेज, राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक यांसह लोकनायक जयप्रकाश नारायण कुष्ठरोग निर्मूलन समितीच्या प्रमुख, जाणीव चॅरिटेबल ट्रस्टचे पदाधिकारी यांनीही मोठ्या संख्येनं वृक्षारोपण केलं. दत्तक परिसरामध्ये या सर्व उपस्थित अतिथी आणि प्राचार्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आलं.

वृक्षारोपण केल्यानं पर्यावरण संतुलन राखण्यासाठी जास्तीत जास्त झाडं लावण्याची गरज असून त्यामुळे पाण्याची पातळी, हवामान नियंत्रित राहण्यास मदत होते.
- विनोद गवारे, सहाय्यक प्राचार्य, साठ्ये महाविद्यालय

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा